आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस पेटवून शेतकऱ्यास मारहाण, दोघांविरुद्ध गुन्हा; आठ लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा- तालुक्यातील लोहारा येथे शेतातील ऊस पेटवून देऊन याबाबत विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यास शिविगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लोहारा येथील शिवारातील गौतम दबडे यांच्या ऊसाच्या शेतातून धुर निघत असल्याने ते पाहण्यासाठी गौतम दबडे गेले होते. यावेळी गावातील रणजित बागल व संभाजी बागल यांनी सदरील ऊस पेटवला होता. यात गौतम यांचे पाच ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. ऊस का पेटवला म्हणून गौतम यांनी विचारणा केली असता दोघांनी शिविगाळ व मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी गौतम दबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वरील दोघांविरोधात परंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...