आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगात प्रथमच: एचआयव्ही पॉझिटिव्ह महिलेने आपल्यासारख्या रुग्णाला दिली किडनी, शस्त्रक्रिया करणाऱ्यांत भारतीय डॉक्टर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाल्टिमोर(अमेरिका)- जगात प्रथमच एचआयव्ही पॉझिटिव्ह महिला दात्याची किडनी एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आली. ही शस्त्रक्रिया या आठवड्यात बाल्टिमोरच्या जॉन हॉपकिन्स रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली. या चमूत भारतीय वंशाचे डॉ. नीरज मनुभाई देसाई हेही होते. रुग्णालयानुसार, दोघेही स्वस्थ आहेत. आतापर्यंत मृत एचआयव्ही पॉझिटिव्ह दात्याच्या अवयवांचेच प्रत्यारोपण होत होते.

 

किडनी देणाऱ्या महिलेचे नाव नीना मार्टिनेज आहे. ती अटलांटात राहते. सध्या ३६ वर्षांच्या असलेल्या नीना यांना त्या ६ महिन्यांच्या होत्या तेव्हाच त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले होते.  नीना यांच्या मते,‘एचआयव्ही पीडित कमजोर असतात असे लोकांना वाटते. पण तसे नाही. मी तर चांगल्या दात्यासारखीच आहे. मी ३५ वर्षांपासून या आजाराला तोंड देत आहे. या जीवघेण्या आजारानंतरही कोणाला जीवनदान देता येऊ शकते. यामुळे विचारसरणी बदलेल आणि एचआयव्ही पीडितही जिवंत राहण्यासाठी पुढे येतील.  

 


ही शस्त्रक्रिया डॉ. नीरज देसाई, डोरी सेगेव्ह आणि त्यांच्या चमूने केली.  २०१३ च्या आधी अमेरिकेत दोन एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांत अवयव प्रत्यारोपण होऊ शकत नव्हते. डॉ. सेगेव्ह यांच्या शोधानंतर धोरणात बदल झाला आणि एचआयव्ही पीडित रुग्णांंत प्रत्यारोपणाला मंजुरी मिळाली. डॉ. देसाई यांनी सांगितले की, जिवंत दात्याने दिलेली किडनी दीर्घकाळ काम करते. एचआयव्ही पीडित असेच समोर आले तर इतर पीडितांनाही मदत होऊ शकेल.