आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hizbul Mujahideen Terrorists Killed In Encounter With Security Forces In Anantnag

अनंतनाग जिल्ह्यात पाच तास चकमक; ३ दहशतवादी ठार; सफरचंदांवर लिहिल्या स्वातंत्र्याच्या, भारतविरोधी घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंतनाग- दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये आज(बुधवार) लष्कर आणि दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. पोलिसांना बिजबेहराच्या पजालपोरा परिसरातील एका घरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्या आधारावर लष्कराने कारवाई केली. सुरुवातील दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, परंतु त्यांनी नकार दिल्यामुळे लष्कराने विस्फोट करुन घराला उडवले. यात हिजबुलचा कमांडर नासिर चदरूसहित 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

दहशतवाद्यांकडे भरपूर प्रमाणात दारुगोळा सापडला
अनंतनाग पोलिसांनी सांगितल्यानुसार, चकमकीत मारले गेलेले तिघेही हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते. यात सामील असलेला नासिर चदरू हिजबुल कमांडर होता. इतर दोघे जावेद फारूक आणि अकुब अहमद हे होते. त्यांच्याजवळ लष्कराला भरपूर प्रमाणात दारूगोळा सापडला.
 

मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर पहिलीच चकमक
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यात सर्व मोबाइल सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी 70 दिवसानंतर घाटीत पोस्टपेड मोबाइल सेवा सुरू झाली. त्यामुळे, मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर दहशतवाद्यांसोबत ही पहिलीच चकमक झाली आहे. 
 

सफरचंदांवर लिहिल्या स्वातंत्र्याच्या, भारतविरोधी घोषणा

जम्मू - कलम ३७० रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी संघटनांनी आता नवी चाल खेळली आहे. जम्मू-काश्मीरमधून जगभर जाणाऱ्या सफरचंदांवर आता या दहशतवाद्यांनी  भारतविरोधी घोषणा लिहून ती पाठवली आहेत. आम्हाला स्वातंत्र्य हवे, मला बुऱ्हान वानी आवडतो, जाकिर मुसा पुन्हा परतेल अशा आशयाच्या या घोषणा आहेत. कठुआतून सफरचंदांवर या घोषणा लिहिल्या असल्याचे विक्रेत्यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी याची तक्रार पोलिसांत केली. जम्मू-काश्मीर प्रशासनाने याविरुद्ध कारवाई केली नाही तर काश्मिरी सफरचंद मागवणे बंद करू, असा इशारा अनेक विक्रेत्यांनी दिला.