आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात सुरू होते खोदकाम तेवढ्यात आला एक आवाज आणि कैद्यांनी थांबवले काम, माती हटवली तर सर्वांनाच बसला धक्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लेवेन - बुल्गेरियाच्या एखा तुरुंगात खोदकाम सुरू होते. त्याचवेळी कैद्यांना एक वेगळाच आवाज ऐकायला आला. त्यानंतर त्यांनी काम थांबवले. कैद्यांनी जेव्हा माती काढून पाहिले तेव्हा त्याठिकाणी मातीचे दोन भांडे आढळले. त्यात चांदीची नाणी भरलेली होती. तुर्कस्तान साम्राज्याचे असलेली ही जवळपास 8 किलोची नाणी होती. 


7 हजारांहून अधिक नाणी 
- बुल्गेरियाच्या प्लेवेन शहरातील ही घटना आहे. याठिकाणी तुरुंगात खोदकाम सुरू होते. त्याचवेळी थोडेच खोदकाम झाले होते तेव्हा कैद्यांना एक विचित्र आवाज ऐकू आला. त्यानंतर ते थांबले आणि त्यांनी माती बाजुला करून  पाहिले. 
- माती हटवल्यानंतर त्याठिकाणी मातीची दोन भांडी आढळली. त्यात पूर्णपणे चांदीची नाणी भरलेली होती. त्याठिकाणी एकूण 7046 चांदीची नाणी आढळली. त्यांचे वजन 8 किलोपेक्षा जास्त होते. ही सर्व नाणी तुर्ककालीन आहेत. 
- खोदकाम करताना आढळलेल्या नाण्यांबाबत पुरातत्व विभागाचे अधिकारी व्लादिमीर नेबडेनोव्ह यांचे असे म्हणणे आहे की, सर्व नाणी विविध प्रकारची आहेत आणि ती अनेक वर्षे त्याठिकाणी जमा करण्यात आली होती. 
- मध्ययुगाच्या दरम्यान 14 व्या शतकाच्या अखेरीस बुल्गेनियन साम्राज्याने तुर्की साम्राज्यावर हल्ला केला होता. त्याचवेळी तेथून ही नाणी लुटून आणलेली असू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 
- व्लादिमीर यांच्या मते, 19व्या शतकातील इतिहासाबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा खजाना माहितीचा मोठा स्त्रोत ठरू शकतो. 

 

बातम्या आणखी आहेत...