आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला टीमचा सत्रात पहिला विजय; राणीचा डबल धमाका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेंडूवर ताबा मिळवताना भारताची राणी (लाल टी-शर्ट). तिने दाेन गाेल केले.

ऑकलंड : अनुभवी कर्णधार राणी रामपालच्या कुशल नेतृत्वाखाली भारतीय महिला हाॅकी संघाने यंदाच्या सत्रात विजयाचे माेठ्या दिमाखात खाते उघडले. भारताने सत्रातील अापल्या सलामी सामन्यात यजमान न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. भारताच्या विजयात कर्णधार राणीने दाेन अाणि नमिता, शर्मिलाने प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. त्यामुळे भारताला माेठ्या फरकाने एकहाती विजय मिळवता अाला.

यासह भारताने दाैऱ्यातील न्यूझीलंडविरुद्ध चार सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी घेतली. भारताचा मालिकेतील दुसरा सामना अाता उद्या साेमवारी हाेणार अाहे. भारतीय संघ या दाैऱ्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध चार अाणि इंग्लंडविरुद्ध एक सामना खेळणार अाहे. या सामन्यांच्या माध्यमातून भारताचा महिला संघ अागामी टाेकियाे अाॅलिम्पिक स्पर्धेची तयारी करणार अाहे. यासाठी सज्ज असल्याचे संघाने दाखवून दिलेे.
 

बातम्या आणखी आहेत...