आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेल्जियमने भारताला रोखले; कॅनडा-आफ्रिका लढत बरोबरीत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - पाहुण्या बेल्जियम संघाने हाॅकीच्या विश्वचषकात बलाढ्य भारतीय संघाविरुद्धची अापली पराभवाची मालिका खंडित केली. यासह बेल्जियमच्या हाॅकी संघाने रविवारी स्पर्धेतील अापल्या दुसऱ्या सामन्यामध्ये यजमान भारताला बराेबरीत राेखले. हा रंगतदार सामना २-२ ने बराेबरीत राहिला. गाेऊनार्डने (५६ वा मि.) शानदार गाेल करून बेल्जियम संघाला बराेबरी मिळवून दिला. यामुळे या संघाला अापला पराभव टाळता अाला. बेल्जियमकडून हेडरिक्सने ८ व्या मिनिटाला गाेलचे खाते उघडले हाेते. भारताकडून हरमनप्रीत सिंग (३९ वा मि.) अाणि सिमरनजीत सिंगने (४७ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल केला. त्यामुळे हा सामना बराेबरीत राहिला. यामुळे अाता दाेन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात अाला. 

 

भारतीय संघाचा अाता सलग दुसरा विजय संपादन करण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. यासाठी टीमच्या युवांनी माेठा प्रयत्न केला. मात्र, बेल्जियमच्या गाेऊनार्डने सामन्याला कलाटणी दिली. त्याने ५६ व्या मिनिटाला गाेल केला. त्यामुळे सामन्यात बराेबरी साधता अाली. 

 

अाता कॅनडाशी झंुजणार : भारताचा स्पर्धेतील तिसरा सामना अाता ८ डिसेंबर राेजी कॅनडाशी हाेईल. या सामन्यात भारताला विजयाची संधी अाहे. तसेच बेल्जियमचा तिसरा सामना अाता दक्षिण अाफ्रिकेशी हाेईल. 


कॅनडा अाणि दक्षिण अाफ्रिकेतील सामना राहिला १-१ ने बराेबरीत; दाेन्ही संघांना प्रत्येकी एक गुण 
दक्षिण अाफ्रिका टीमचा विश्वचषकात विजयी ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. कॅनडाच्या टीमने सरस खेळी करताना सामन्यात अाफ्रिकेला बराेबरीत राेखले. या दाेन्ही संघांमधील रंगतदार सामना १-१ ने बराेबरीत राहिला. नकाेबिली एनतिलीने ४३ व्या मिनिटाला गाेल करून अाफ्रिकेला अाघाडी मिळवून दिली हाेती. त्यामुळे अाफ्रिका संघाच्या विजयाच्या अाशा पल्लवीत झाल्या हाेत्या. मात्र, त्यानंतर अवघ्या दाेन मिनिटांत कॅनडाच्या कर्णधार स्काॅट टपरने सामन्याला कलाटणी दिली. त्याने दाेन मिनिटांत शानदार गाेल करताना संघाला बराेबरी मिळवून दिली. त्यामुळे या दाेन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. हा सामना बराेबरीत राहिला तरी या दाेन्ही संघांच्या अंतिम अाठमधील प्रवेशाच्या अाशा अद्यापही कायम अाहेत.मात्र, अाता या टीमला पुढच्या सामन्यात विजय गरजेचा अाहे. यजमान भारताने सलामीच्या सामन्यात अाफ्रिकेचा पराभव केला हाेता. त्यामुळे अाता अाफ्रिकेचा गुणतालिकेत एक गुण झाला अाहे. 

 

स्पेन-फ्रान्स २८ वर्षांनंतर समाेरासमाेर; दाेन्ही संघांची नजर अाज विजयाकडे 
तब्बल २८ वर्षांनंतर अाता विश्वचषकाच्या सामन्यात स्पेन अाणि फ्रान्सचे हाॅकी संघ अाज साेमवारी समाेरासमाेर असतील. १९९० च्या विश्वचषकात स्पेन संघाने लाहाेर येथील मैदानावर फ्रान्सचा ४-३ ने पराभव केला हाेता. तसेच दुसऱ्या सामन्यात अर्जेंटिनासमाेर न्यूझीलंडचे अाव्हान असेल. अातापर्यंत या दाेन्ही संघांमध्ये वर्ल्डकपचे एकूण सहा सामने झाले अाहेत. यात अर्जेंटिनाने ४ अाणि न्यूझीलंडने एक सामना जिंकला अाहे. मात्र, यंदाच्या स्पर्धेदरम्यान या दाेन्ही संघांना अद्याप विजयाची नाेंद करता अालेली नाही. त्यामुळे हे दाेन्ही संघ विजयासाठी उत्सुक अाहे. अ गटातील या दाेन्ही संघांना अापल्या पहिल्याच सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. त्यामुळे अाता विजयी ट्रॅकवर येण्याचा स्पेन अाणि फ्रान्स संघाचा प्रयत्न असेल. 

बातम्या आणखी आहेत...