आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ल्ड कप: भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीची संधी; आज बेल्जियमविरुद्ध झुंज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - सलामीच्या धडाकेबाज विजयाने जबरदस्त फॉर्मात असलेला यजमान भारतीय संघ आता हॉकी विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशासाठी सज्ज झाला. भारताच्या टीमला आज रविवारी ही मोठी संधी आहे. भारत आणि बेल्जियम यांच्यात सामना रंगणार आहे. यातील विजयाने भारताचा अंतिम आठमधील प्रवेश निश्चित होईल. आता स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद करण्यासाठी यजमान भारताचा संघ उत्सुक आहे. भारताने सलामीला बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला 5-0 अशा फरकाने पराभूत केले. या मोठ्या विजयाने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे हीच विजयी मोहीम कायम ठेवण्यावर भारताची नजर आहे. दुसरीकडे बेल्जियमने सलामीला कॅनडाचा पराभव केला आणि स्पर्धेतील आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. 

 

हॉलंडची मलेशियावर 7-0 ने मात : 
माजी विश्वविजेत्या हॉलंड संघाने शनिवारी वर्ल्डकपमध्ये शानदार विजय संपादन केला. या संघाने सामन्यात मलेशियावर 7-0 ने मात केली. गत उपविजेत्या हॉलंडचा या टीमविरुद्धचा हा 29 वा विजय ठरला.  

 

बातम्या आणखी आहेत...