आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुवनेश्वर - हाॅकीच्या विश्वचषक स्पर्धेला उद्या बुधवारपासून भुवनेश्वर येथील मैदानावर सुरुवात हाेत अाहे. भारतात हा वर्ल्डकप १६ डिसेंबरपर्यंत म्हणजेच १९ दिवसांपर्यंत रंगणार अाहे. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील १६ संघ अापले नशीब अाजमावतील. यजमान भारतीय संघही घरच्या मैदानावरील या स्पर्धेत अव्वल कामगिरी करण्यासाठी उत्सुक अाहे. भारतीय संघ तब्बल ४३ वर्षांपासून विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा करत अाहे. भारताने १९७५ मध्ये हाॅकीचा वर्ल्डकप जिंकला हाेता. मात्र, त्यानंतर चार दशके भारताला या स्पर्धेच्या फायनलचाही पल्ला गाठता अाला नाही. या स्पर्धेत पाकचा संघ चार वेळा चॅम्पियन ठरला अाहे. हे सर्वाधिक वेळा यश पाकच्या टीमला संपादन करता अाले. १९८६ मध्ये पहिल्यांदा विश्वचषकाचे सामने सिंथेटिक टर्फवर अायाेजित करण्यात अाले. या टर्फच्या मैदानामुळे अाशियातील संघांच्या कामगिरीचा दर्जा घसरला. त्यामुळेच १९८६ नंतर अातापर्यंतच्य अाठ स्पर्धेत केवळ एकदाच अाशियाई टीमला ही ट्राॅफी जिंकता अाली. म्हणजे मागील २४ वर्षांपासून अाशियाई टीम वर्ल्डकप ट्राॅफी जिंकण्याच्या प्रतीक्षेत अाहेत.
गवतावर पहिले ५ वर्ल्डकप
हाॅकीच्या विश्वचषकाला १९७१ मध्ये सुरुवात झाली. पहिली विश्वचषक स्पर्धा स्पेनमध्ये अायाेजित करण्यात अाली हाेती. या स्पर्धेत १० संघ सहभागी झाले हाेते. यात पाकिस्तान संघाने बाजी मारली अाणि वर्ल्डकप ट्राॅफी अापल्या नावे केली. त्यानंतर १९८२ मध्ये विश्वचषकाचे सामने गवताच्या मैदानावर झाले. मात्र, वाढत्या प्रतिसाद अाणि प्रतिष्ठेमुळेच मैदानाच्या स्वरूपातही माेठा बदल झाला. त्यामुळेच १९८६ मध्ये लंडन येथे पहिल्यांदा टर्फचा वापर करण्यात अाला. यामुळे खेळाचा दर्जा उंचावला अाणि खेळात वेग अाला. मात्र, यामुळे अाशियातील टीमचा फार काळ निभाव लागला नाही. तीन वेळच्या विश्वविजेत्या पाकचा पहिल्याच टर्फवरील वर्ल्डकपमध्ये लीगच्या सामन्यातच लाजिरवाणा पराभव झाला. या टीमला टर्फच्या मैदानावर सरस कामगिरी करता अाली नाही. यानंतर अाशियातील संघ या मैदानावर सपशेल अपयशी ठरले.
स्किलच्या जागी स्पीड अाली
गवताच्या मैदानावरचा खेळ हा फारच संथ गतीने खेळला जात हाेता. त्यामुळे या मैदानावर खेळाडू हे अापल्यातील काैशल्याच्या बळावर खेळत हाेते. यातून ड्रिब्लिंग अाणि पासिंगचा माेठ्या प्रमाणात वापर केला जायचा. यामध्ये अाशियाई टीमचे खेळाडू सातत्याने वरचढ ठरत हाेते. मात्र, टर्फच्या वापरामुळे अाशियातील खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम पडला. या मैदानामुळे खेळाडंूमधील स्किलच्या जागी स्पीड अाली. वेगामुळे खेळाला रंगत अाली. मात्र, खेळाडूंमधील काैशल्य यामुळे लाेप पावले. यातून अाशियातील प्रतिभावंत खेळाडूंचा या मैदानावर निभाव लागला नाही. युराेपातील संघांनी या मैदानावर अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावला अाणि अापले अाशियाई टीमचे वर्चस्व संपुष्टात अाणले.
टर्फमुळे गाेलच्या संख्येत दुपटीने वाढ; सामन्यागणिक चार गाेलची झाली नाेंद
हाॅकीचे टर्फ मैदान हे सिंथेटिक ग्रासने तयार केले जाते. सामन्यापूर्वी मैदानावर पूर्णपणे पाणी टाकले जाते. त्यामुळे स्कीट झालेल्या चेंडूला प्रचंड वेग असताे. टर्फच्या वापरामुळे खेळात प्रचंड वेग अाला अाणि गाेल करण्याची संख्या दुपटीने वाढली. पहिल्या वर्ल्डकपच्या एका सामन्यात सरासरी दाेन गाेल झाले. मात्र, २०१४ च्या शेवटच्या वर्ल्डकपमध्ये सामन्यागणिक चार गाेलची नाेंद झाली. म्हणजेच याच्या संख्येत दुपटीने वाढ झाली.
25 देशांचे संघ अातापर्यंत वर्ल्डकपमध्ये सहभागी
07 संघांनी मारली फायनलमध्ये धडक
569 सामने झाले अातापर्यंत
2276 गाेलची नाेंद अातापर्यंत
'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित, शाहरुखच्या उपस्थितीत उद््घाटन साेहळा
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवर हाॅकी विश्वचषक स्पर्धेचा उद््घाटन साेहळा रंगणार अाहे. या साेहळ्याला धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दीक्षितसह सिनेभिनेता शाहरुख खान, एअार रहमान उपस्थित राहणार अाहेत. हे कलाकार अापल्या कला सादर करतील. संध्याकाळी ५.३० वाजता या साेहळ्याला सुरुवात हाेईल. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पाेर्ट््स अाणि दूरदर्शनवर हाेणार अाहे.
यंदा १६ संघ झाले सहभागी
अ गट : अर्जेंटिना, न्यूझीलंड, स्पेन, फ्रान्स.
ब गट : अाॅस्ट्रेलिया, इंग्लंड, अायर्लंड, चीन
क गट : बेल्जियम, भारत, कॅनडा, द. काेरिया
ड गट : हाॅलंड, जर्मनी, मलेशिया, पाकिस्तान
प्रत्येक सामन्यात प्रत्येकी १५ मिनिटांचे चार क्वार्टर
पहिल्यांदा क्राॅस अाेव्हरचे सामने. जसे प्रत्येक गटातील दुसऱ्या अाणि तिसऱ्या स्थानावरील टीमला अंतिम अाठची संधी. अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघाची लढत ब गटातील तिसऱ्या स्थानावरील संघाशी हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.