आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 टक्के सामने पूर्ण; सामन्यागणिक 3.5 गाेल झालेे, 24 वर्षांत सर्वात कमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर - भारतामध्ये सुरू असलेल्या हाॅकी विश्वचषकातील सामन्यांना अाता चांगलीच रंगत चढत अाहे. यात क्राॅसअाेव्हरचे महत्त्वाचे याेगदान अाहे. यावरच हे सर्व सामने हाेत अाहेत. म्हणजेच प्रत्येक गटातील चारपैकी तीन संघांना पुढच्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्याची संधी अाहे. मात्र, यामुळे सध्याच्या विश्वचषकात गाेल करण्याच्या सरासरीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही सरासरी मागील २४ वर्षांत सर्वात कमी असल्याचे चित्र अाहे. 

 

या स्पर्धेत अाता मंगळवारपर्यंत एकूण १४ सामने झाले. यादरम्यान ४९ गाेलची नाेंद झाली. म्हणजेच प्रत्येक सामन्यात ३.५ गाेल झाले. या सरासरीचे प्रमाण गत विश्वचषकात अधिक हाेते. यात सामन्यागणिक ४.२६ गाेलची नाेंद झाली हाेती. 

 

गत सात वर्ल्डकपमधील गाेलची सरासरी 
वर्ष गोल सरासरी सामने 

१९९४ ३.३९ ३८ 
१९९८ ४.९८ ४२ 
२००२ ४.१७ ७२ 
२००६ ४.१४ ४२ 
२०१० ५.२४ ३८ 
२०१४ ४.२६ ३८ 
२०१८ ३.५ १४* 

 

हे अाहे क्राॅसअाेव्हर; गटातील तीन संघांना पुढच्या फेरीची मिळते संधी 
स्पर्धेत सहभागी झालेल्या १६ संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात अाली. प्रत्येक गटातील अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत गाठतील. दुसऱ्या य तिसऱ्या स्थानावरील टीमला अंतिम अाठमधील प्रवेशाची संधी अाहे. अ गटातील दुसऱ्या अाणि ब गटातील तिसऱ्या टीमचा सामना करेल. अ गटातील तिसऱ्या स्थानावरच्या संघासमाेर ब गटातील दुसऱ्या स्थानावरील टीमचे अाव्हान असेल. याला क्राॅसअाेव्हर सामने म्हटले जाते. 

 

एका सामन्यात १० मिनिटे कमी झाली, प्रत्येकी १५ मिनिटांचे ४ क्वार्टर 
पहिल्यांदा विश्वचषकात प्रत्येकी १५ मिनिटांचे चार क्वार्टर झाले अाहेत. त्यानुसार हा सामना खेळला जाताे. म्हणजेच एका सामन्यासाठी ६० मिनिटे लागतात. गत विश्वचषकात प्रत्येकी ३५ मिनिटांचे दाेन हाफ हाेते. यामुळे अाता १० मिनिटांची घट झाल्याचे दिसून येते. १ सप्टेंबर २०१४ पासून अांतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनने सर्वच सामन्यांत चार क्वार्टरचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. २०१६ च्या रिअाे अाॅॅलिम्पिक स्पर्धेतही हा नियम लागू झालेला हाेता. 

 

गटातील प्रत्येक संघाची नजर अाहे शानदार विजयावर : चार्ल्सवर्थ 
या नव्या नियमामुळे बलाढ्य संघांना विश्वचषकातील पुढच्या फेरीतील प्रवेशाची संधी मिळत अाहे. याच कारणामुळे गटातील प्रत्येक संघाची नजर ही विजयावर लागलेली अाहे. त्यांचा प्रयत्न पराभव टाळण्याचा असताे. यातून सामन्यातील या संघांची खेळी संथ झाली अाहे. मात्र, हा खेळाचा भाग अाहे, अशी प्रतिक्रिया दाेन वेळच्या विश्वविजेत्या अाॅस्ट्रेलियन टीमचे माजी खेळाडू रिक चार्ल्सवर्थ यांनी दिली. 

 

१६ वर्षांनंतर जर्मनीने जिंकले सलग २ सामने 
सलामीच्या विजयाने अात्मविश्वास द्विगुणीत झालेल्या जर्मनी संघाने अाता विश्वचषकात डबल धमाका उडवला. या संघाने स्पर्धेत सलग दाेन सामने जिंकून विजयाचा धमाका उडवला अाहे. जर्मनीने अाता मंगळवारी हाॅलंडचा पराभव केला. जर्मनीच्या संघाने ४-१ अशा फरकाने स्पर्धेतील अापला दुसरा सामना जिंकला अाहे. मेथियस म्युलर (३० वा मि.), लुकास विनफेडर (५२ वा मि.), मार्काे (५४ वा मि.) अाणि क्रिस्टाेफर रुरने (५८ वा मि.) यांनी प्रत्येकी एक गाेल करून जर्मनी संघाचा शानदार विजय निश्चित केला. हाॅलंडसाठी वेलेंटिन वर्गाने १३ व्या मिनिटाला गाेल केला. मात्र, इतर खेळाडूंच्या अपयशाने हाॅलंडच्या टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे जर्मनीच्या टीमला तब्बल १६ वर्षानंतर पहिल्यांदा विश्वचषकात सलग दाेन सामने जिंकण्याचा पराक्रम गाजवता अाला अाहे. हाॅलंड टीमचा सलग दुसऱ्या विजयाचा प्रयत्न अपयशी ठरला. 

 

49 गोल झाले अातापर्यंत स्पर्धेत 
32 फील्ड गोल ,15 कॉर्नरने झाले 
7 सर्वाधिक गाेल भारतासह अर्जेटिना, न्यूझीलंडने केले 

बातम्या आणखी आहेत...