आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होलाष्टक सुरु आणि होलिका दहन 9 मार्चला, या काळात करावी भगवान विष्णूंची विशेष पूजा

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

मंगळवार 3 मार्चपासून होलाष्टक सुरु झाले असून हे होळीच्या दिवसापर्यंत म्हणजे 9 मार्चपर्यंत राहील. या दिवसांमध्ये मंगल कर्म केले जात नाहीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार प्राचीन काळी राक्षसांचा राजा हिरण्यकश्यपूने फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून श्रीविष्णू भक्त प्रल्हादला यातना देण्यास सुरुवात केली होती. या दरम्यान प्रल्हाद श्रीविष्णूंचे नामस्मरण करत राहिला आणि त्याच्यावर यातनांचा काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर फाल्गुन मासातील पौर्णिमेला हिरण्यकश्यपूची बहीण होलिकाने प्रल्हादला जाळण्याचा प्रयत्न केला परंतु यामध्ये ती स्वतःच जाळून राख झाली. तेव्हापासून या मासातील अष्टमी तिथीपासून पौर्णिमेपर्यंत भगवान विष्णूंची विशेष पूजा करण्याची प्रथा सुरु करण्यात आली आहे.

भगवान विष्णूंच्या मंत्राचा जप करावा - ऊँ नारायणाय विद्महे, वासुदेवाय धीमहि, तन्नो विष्णु प्रचोदयात्।

  • अशाप्रकारे करावी श्रीविष्णू उपासना

> रोज सकाळी लवकर उठून तळहाताचे दर्शन घ्यावे. स्नान करून श्रीविष्णू मंत्र ऊँ नमो भगवते वासुदेवायचा 108 वेळेस जप करावा. > स्नान करून पवित्र झाल्यानंतर एखाद्या विष्णू मंदिरात जाऊन देवाला केळी आणि हलव्याचा नैवेद्य दाखवावा. > होलाष्टक काळात भगवान श्रीविष्णू आणि देवी महालक्ष्मीची एकत्र पूजा अवश्य करावी. > भगवान विष्णूंचे अवतार श्रीकृष्णाला लोणी आणि खीरचा नैवेद्य दाखवावा.

बातम्या आणखी आहेत...