आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

499 वर्षांनंतर होळीला गुरु आणि शनीचा खास योग, या दिवशी श्रीविष्णूंसोबतच करावी गुरु-शनीची पूजा

एका वर्षापूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

सोमवार 9 मार्चला फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केले जाईल. दुसऱ्या दिवशी मंगळवारी 10 मार्चला धूलिवंदन आहे. या वर्षी गुरु आणि शनी एक दुर्लभ योग तयार करत आहेत. हा योग 499 वर्षांनंतर जुळून येत आहे. होळीला हे दोन्ही ग्रह आपापल्या उच्च राशीत राहतील. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, या योगामध्ये कोणकोणते शुभ काम केले जाऊ शकतात...

होळीला गुरु धनु राशीमध्ये आणि शनी मकरमध्ये 
पं. शर्मा यांच्यानुसार 9 मार्चला गुरु स्वतःच्या धनु राशीमध्ये आणि शनी स्वराशी मकरमध्ये राहील. यापूर्वी या दोन्ही ग्रहांचा असा योग 3 मार्च 1521 मध्ये जुळून आला होता, तेव्हाही हे दोन्ही ग्रह आपापल्या राशीमध्ये होते. ग्रहांच्या या योगामध्ये होळी आल्यामुळे हे शुभफळ प्रदान करणारे राहील. प्रत्येक वर्षी सूर्य कुंभ राशीमध्ये आणि चंद्र सिंह राशीमध्ये आल्यानंतर होळी साजरी केली जाते.

कोणकोणते शुभ काम करावेत 
होळीला मुख्यतः भगवान विष्णूंची पूजा केली जाते. प्राचीन काळी फाल्गुन मासामध्ये पौर्णिमेला विष्णू भक्तीमुळे जीवनदान मिळाले होते. तेव्हापासून प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहनसोबतच भगवान विष्णूंची पूजा करण्याची प्रथा प्रचलित आहे. श्रीविष्णूंसोबत महालक्ष्मीची प्रतिमा ठेवावी. केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा. पिवळे वस्त्र अर्पण करावे. मिठाईचा नैवेद्य दाखवावा.  ऊँ नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करावा. 

या वर्षी होळीला शनी मकर राशीमध्ये राहील. शनिदेवासाठी ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा जप करावा. शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत. एखाद्या गरिबाला काळे उडीद दान करावेत.

होलिका दहनपूर्वी होळीची विधिव्रत पूजा करावी. परिक्रमा घालाव्यात. धान्य, नारळ इ. गोष्टी होळीमध्ये टाकाव्यात.

बातम्या आणखी आहेत...