आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hollywood Actor Dwayne Johnson Said About His Secret Wedding 'It Was A Right And Personal Decision'

सीक्रेट वेडिंग केल्याबद्दल हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉनसन म्हणाला - 'हा योग्य आणि माझा वैयक्तिक निर्णय होता' 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : अभिनेता ड्वेन जॉनसन म्हणजेच 'द रॉक' याने 18 ऑगस्टला हवाईमध्ये आपली गर्लफ्रेंड आणि सिंगर लॉरेन हॅशियनसोबत गुपचूप लग्न केले. डी23 एक्सपोदरम्यान जॉनने आपली सीक्रेड वेडिंग सुंदर आणि अद्भुत असल्याचे सांगितले. जॉन म्हणाला - 'आम्ही हे खाजगी ठेवले जे योग्य होते.' जेव्हा रॉकला सीक्रेड वेडिंगविषयी विचारले गेले तेव्हा तो म्हणाला की, तो आपल्या आयुष्यातील नव्या पर्वाचा आनंद घेत आहे. 
 

 

13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते दोघे... 
जॉनसन आणि लॉरेन यांची भेट 2006 मध्ये झाली होती. तेव्हा रॉक 'द गेम प्लान'चे शूटिंग करत होता. दोघांनी 2007 मध्ये डेटिंगला सुरुवात केली होती. दोघांच्या दोन मुली जॅस्मिन आणि टियाना आहेत. रॉक आणि लॉरेनने आपल्या लग्नबद्दल इंस्टाग्रामवर पोस्ट करून माहिती दिली.  
 

जॉन सर्वात जास्त कमाई करणारा अभिनेता आहे...  
फोर्ब्स मॅगझिनच्या लिस्टमध्ये जगभरात सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये ड्वेन जॉनसन अव्वल क्रमांकावर आहे. त्याला आगामी चित्रपट "जुमांजी : द नेक्स्ट लेव्हल" साठी आतापर्यंतची सर्वात जास्त म्हणजेच 23.5 मिलियन डॉलर एवढी फीस दिली जाणार आहे. ही पहिली वेळ नाही जेव्हा  ड्वेनने कमाईच्या बाबतीत बाजी मारली आहे. 2016 मध्येदेखील तो टॉपवर होता, तर 2017 आणि 2018 मध्ये त्याचा दूसरा क्रमांक होता.