Home | International | Other Country | Hollywood Actress Vanessa Marquez Shot Dead By Cops After She Pointed Toy Gun At Them

हॉलिवूड अभिनेत्री व्हॅनेसाने पोलिसांना दाखवली Toy Gun, अधिकाऱ्यांनी गोळ्या झाडून ठार मारले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 01, 2018, 11:42 AM IST

मार्केझ ज्या घरात राहत होती ती भाड्याचे होते. घरमालकाने तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने पोलिसांना फोन करून बोलावले होते.

  • Hollywood Actress Vanessa Marquez Shot Dead By Cops After She Pointed Toy Gun At Them

    लॉस एंजेलिस - अमेरिकेतील एका हॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांनी गोळ्या झाडून ठार मारले आहे. व्हॅनीसा मार्केझ (49) हिने पोलिसांना टॉय गन दाखवली होती. पोलिसांनी ती खरी वाटली आणि त्यांनी तिच्यावर दोन गोळ्या झाडल्या. या घटनेत व्हॅनेसाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी अधिकारी तिच्या पॅसाडेना येथील घरात एका कामानिमित्त गेले होते. त्याचवेळी तिने पोलिसांना बनावट बंदूकीचा धाक दाखवला.


    तिला गोळ्या घातल्यानंतर पोलिसांनी तिच्या शस्त्राची तपासणी केला. त्यानंतर तिची बंदूक एक खेळणी असल्याचे समोर आले. मार्केझ ज्या घरात राहत होती ती भाड्याचे होते. घरमालकाने तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने पोलिसांना फोन करून बोलावले होते. पोलिस घटनास्थळी एक मानसोपचार तज्ञ आणि डॉक्टरांच्या टीमला घेऊन तिच्या घरी पोहोचले होते. पोलिसांनी तज्ञांच्या मदतीने तिच्याशी तासभर संवाद साधला. परंतु, ती समोर येण्यास तयारच नव्हती. पोलिस अखेर तिच्या घरात शिरले तेव्हा तिच्या हातात बंदूक होती. तिच्या हातात असलेली बंदूक पोलिसांनी खरी वाटली आणि त्यांनी तिच्यावर गोळीबार केला.


    1994 ते 1997 मध्ये अमेरिकेत गाजलेला प्रसिद्ध टीव्ही शो ER, Seinfeld आणि Melrose Place मध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. गतवर्षी ती ER टीव्ही शोचा सहकारी आणि प्रसिद्ध हॉलिवूड सुपरस्टार जॉर्ज क्लूनीच्या शोमध्ये लैंगिक शोषण आणि वर्णद्वेषाचे आरोप लावून चर्चेत आली होती. आपण या विषयावर बोललो म्हणूनच शोमधून बाहेर काढले होते असा आरोपही तिने केला होता. परंतु, क्लूनीने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. आपण, त्या शोचे दिग्दर्शक किंवा लेख नव्हतो फक्त अॅक्टिंग केल्याने मला कुणी जबाबदार धरू शकत नाही अशी प्रतिक्रिया क्लूनीने दिली होती.

Trending