आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड प्रोड्यूसर हार्वे विंस्टीनला 23 वर्षांची शिक्षा, आरोपीचे वकील म्हणाले - ज्यूरीने मीटूच्या दबावामुळे घेतला निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : दुष्कर्म आणि लैंगिक शोषणातील आरोपी हार्वे विंस्टीनला 23 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली आहे. बुधवारी मॅनहॅटन कोर्टात जस्टिस जेम्स बुर्केने शिक्षेची घोषणा केली. विंस्टीनला न्यूयॉर्कच्या रायकर्स आयर्लंड जेलमध्ये ठेवले जाईल. 24 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये प्रोड्यूसरला लैंगिक हिंसेच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवले गेले. 

विंस्टीनला प्रोडक्शन असिस्टंट मिमी हलेईसोबत लैंगिक हिंसेसाठी 20 आणि अभिनेत्री जेसिका मानसोबत दुष्कर्म केल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. हार्वेचा वकील डॉना रोटुनोने न्यायालयाचा हा निर्णय घाबरून घेतल्याचे म्हणले आहे. ते म्हणाले जजने हा निर्णय मीटू मुव्हमेंटच्या दाबाखाली घेतला आहे. 

शिक्षा सुनावल्यानंतर हॉस्पिटलला पोहोचला विंस्टीन... 

न्यूयॉर्कच्या रायकर्स आयर्लंड जेलमध्ये पोहोचल्याच्या काही वेळानंतरच विंस्टीनला रुग्णालयात नेले गेले. हार्वेच्या प्रवक्ता जूडा एंगलमेयरने सांगितले की, हृदयाच्या त्रासामुळे हार्वेला बैलूव हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. एजन्सीनुसार, मागच्या आठवड्यात विंस्टीनची हार्ट सर्जरी झाली होती.  

न्यूयॉर्क कोर्टात या केसची सुनावणी 12 सदस्यीय ज्यूरीने केली होती. सुमारे 6 आठवड्यांपर्यंत चाललेल्या ट्रायलनंतर विंस्टीनला दुष्कर्म आणि लैंगिक हिंसाचाराच्या दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवले गेले होते. मात्र आरोपीला तीन इतर प्रकरणांमध्ये कोर्टाने निर्दोष ठरवले होते.