आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूडमधील दिग्गज निर्मात्याने बेडरूममध्ये घुसून केला होता बलात्कार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड शो द सोप्रानेसची अभिनेत्री अ‍ॅनाबेल स्कीयराने काही दिवसांपूर्वी आपल्यावरील झालेल्या अत्याचाराची कथा अमेरिकेच्या कोर्टात रडत सांगितली होती. वेन्स्टीन यांनी तिच्यासोबत काय-काय केले आणि तिला किती त्रास झाला याविषयी सविस्तर सांगितले होते. तिने सांगितले, हार्वे तिच्या न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये एका रात्री घुसले आणि तिच्यासोबत बळजबरी केली. हार्वेने तिच्यावर बलात्कार केला. कोर्टात जेव्हा ती सांगत होती, तेव्हा ६७ वर्षीय हार्वे वेन्स्टीनदेखील हजर होते. अ‍ॅनाबेलने त्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला, ती म्हणाली, तो दिवस खूपच वाईट होता, तो क्षण भयंकर होता. मला आजही ताे दिवस आठवला की, मला काही सुचत नाही, मी स्तब्ध होते. त्या दिवशी मी पूर्णपणे घाबरले होते. शरीर भीतीने थरथरत होते. बलात्काराच्या वेळी त्यांना वेडाचा झटका आला की काय, असे मला वाटत होते. त्या वेळी त्यांनी मला आणि स्वत:लाही नुकसान पोहोचवले. ते जास्त प्रमाणात दारू पिऊन आले होते. मला धमकावले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला चावणे सुरू केले. त्यांच्या अशा वेडेपणामुळे मी खूप घाबरून गेले होते. त्यामुळे मी त्यांचा प्रतिकार करू शकले नाही. कारण माझे शरीर थंड पडले होते, हातपाय काम करत नव्हते. अ‍ॅनाबेलसोबत ही घटना १९९३-९४ मध्ये मॅनहॅटनच्या ग्रामेर्सी पार्कमध्ये झाली होती. त्या वेळी तेथे हिवाळा होता. हार्वे यांनी एका बिझनेस डिनरनंतर तिला रेस्टॉरंटमधून घरी सोडले होते. अ‍ॅनाबेलने कोर्टात सांगितले की, मी हार्वे यांना बलात्काराविषयी बोलले होते, तेव्हा ते माझ्यावर रागावले आणि मला धमकी दिली हाेती. कोण आहेत हार्वे वेन्स्टीन हार्वे वेन्स्टीन हॉलीवूडचे प्रख्यात निर्माते आहेत. त्यांना एकेकाळी गाॅड ऑफ हॉलीवूड म्हटले जात होते. त्यांनी शेक्सपिअर इन लव्ह, किल बिल आणि गँग्ज ऑफ न्यूयॉर्क यासारखे मोठे चित्रपट केले आहेत. वेन्स्टीनवर लैंगिक अत्याचार आणि बलात्काराचे अनेक आरोप लागलेले आहेत. त्यांच्यावर आरोप लावणाऱ्यांमध्ये एंजेलिना जोली, रोझ मॅकगाउन, उमा थर्मन, ग्वायनेथ पाल्त्रो आणि सलमा हायेकसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. रोझ मॅकगाउनने आपल्या पुस्तकात खुलासा केला की, १९९७ मध्ये सनडान्स सिने महोत्सवात वेन्स्टीनने एका हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला होता. हॉलीवूडचे प्रख्यात निर्माते हार्वे वेन्स्टीन मी टू प्रकरणातील सर्वात मोठे आरोपी आहेत. त्यांच्यावर एकूण ८० पेक्षा जास्त अभिनेत्री आणि महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात आता महिला समोर येत आहेत.

बातम्या आणखी आहेत...