आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉलिवूड स्टार टॉम हँक्स आणि पत्नी रिटा विल्सन व्हायरसने संक्रमित, ऑस्ट्रेलियात शूटिंगसाठी गेले आहेत टॉम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉलिवूड डेस्क : हॉलिवूडचे सुपरस्टार आणि ऑस्कर विजेते 63 वर्षांचे टॉम हॅन्क्स यांनी खुलासा केला आहे की, ते आणि त्यांच्या पत्नीची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. टॉम यांनी ही माहिती स्वतः आपल्या इंस्टाग्रामवर दिली. टॉम सध्या ऑस्ट्रेलिया येथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलेले आहेत. त्यांची पत्नी रिटा विल्सन यादेखील त्यांच्यासोबतच आहे.  

ऑस्ट्रेलियामध्ये शूटिंगसाठी गेलेले आहेत हँक्स... 

टॉम हँक्स ऑस्ट्रेलियामध्ये प्रसिद्ध अमेरिकन गायक एल्व्हिस प्रेस्ले यांच्यावर बनत असलेल्या चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. त्यांची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली. ते म्हणाले, ‘‘रीटा आणि मी ऑस्ट्रेलियामध्ये आहोत. आम्हाला थकवा जाणवला, थोडा ताप आणि शरीरामध्ये वेदना झाल्या. मात्र आम्ही याचा तणाव घेतला नाही. तपासण्या केल्या तर टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. मेडिकल ऑफिसर प्रोटोकॉलअंतर्गत काम करत आहेत. पब्लिक हेल्थ आणि सेफ्टीसाठी आम्हाला त्यांच्या निगरानीत राहावे लागेल.’’

ट्वीटमध्ये हँक्स हेदेखील म्हणाले की, हे केवळ एका दिवसाचे नाही आम्हाला यासाठी सतत अपडेट व्हावे लागेल. स्वतःची काळजी घ्या.  

बातम्या आणखी आहेत...