Home | Khabrein Jara Hat Ke | Hollywood's most successful 'Titanic' filmmakers have often failed

अनेक वेळा अपयशी झाला होता हॉलीवूडच्या सर्वात यशस्वी ‘टायटॅनिक’ चित्रपटाचा हीरो

दिव्य मराठी | Update - Nov 11, 2018, 08:43 AM IST

कठोर मेहनत आणि गुणवत्ता यांच्या जोरावर त्यांनी अतिशय कमी वेळात संपूर्ण जगात आपले नाव लोकप्रिय केले.

 • Hollywood's most successful 'Titanic' filmmakers have often failed

  हॉलीवूड चित्रपटाच्या यादीत ‘अवतार’नंतर दुसऱ्या क्रमांकावर आतापर्यंत सर्वात जास्त कमावणारा चित्रपट लिओनार्डो डिकैप्रियोचा ‘टायटॅनिक’हाच आहे. अतिशय कठोर मेहनत आणि गुणवत्ता यांच्या जोरावर त्यांनी अतिशय कमी वेळात संपूर्ण जगात आपले नाव लोकप्रिय केले.


  लिआनार्डो डिकैप्रियो यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९७४ रोजी लॉस एंजिलिस, कॅलिफोर्नियामध्ये झाला होता. त्यांचे टोपण नाव लिओ लेनिडी आहे. वडील जॉर्ज डिकैप्रियो, हे व्यवसायाने लेखक होते. लिओने आपले शिक्षण लॉस एंजिलिसच्या सीड्स एलिमेंट्री स्कूलमधून सुरू केले. लहानपणापासूनच लिओला व्हिडीओ गेम्स खेळणे आणि अॅक्शन फिगर गाेळा करणे यांचा फारच छंद होता. तसे पाहायला गेले तर लिओची कहाणी त्याच्या जन्मापूर्वी सुरू झाली होती. जेव्हा त्यांची आई इर्लिन इंडेनबर्किन गर्भवती होती, तेव्हा एक दिवस एका प्रदर्शनात लिओनार्डो दा विंचीचे पेंटिंग पाहून त्याचे अतिशय कौतुक केले. यावेळी तिच्या पोटातील मूल लाथा झाडत होते. तिला असे वाटले की, आपल्याला हे पेंटिंग जितके आवडले आहे तितकेचे ते आपल्या पोटातील मुलालाही आवडले अाहे. तेव्हाच तिने आपल्या मुलाचे नाव लिओनार्डो ठेवायचे असा निर्णय घेतला. लिओ केवळ एक वर्षाचा असताना आई वडिलांच्या आपसांतील मतभेदामुळे त्यांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर लिओ आपल्या आई समवेत राहू लागले. पण वडिलांशीही त्यांचे संबंध चांगले राहिले. आईने अनेक अडचणींना तोंड देऊन लिओचे पालनपोषण केले. घर चालविण्यासाठी तिला काही ठिकाणी नोकरीही करावी लागली. लिओला लहानपणापासूनच अॅक्टिंगचा शौक होता. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लिओला बरीच मदत केली. ते तीन वर्षापर्यंत एका साधारण शाळेत शिकत होते. त्यानंतर त्यांनी अभिनय शिकण्यास सुरुवात केली.


  लहान मुलांच्या एका टीव्ही शोमध्ये वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी प्रथम काम केले. त्या शोचे नाव होते ‘रॉम्पर रूम.’ पण लवकरच त्यांना तिथून पाठविले गेले. कारण लहानपणी त्यांचा स्वभाव अतिशय खोडकर होता.त्यांच्या या स्वभावामुळे टीव्ही शोचे नुकसान होत आहे, असे निर्मात्याचे मत पडले. यानंतर पॅरेंटहूड या टीव्ही शोमध्ये बालकलाकार म्हणून काम केले. पण हा शो फार काळ चालला नाही. १९८९ मध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी लिओने पहिली टीव्ही सिरीयल केली. या सिरियलचे नाव होते ‘द न्यू लैसी.’


  सतराव्या वर्षी ‘क्रिटर्स ३’ या विज्ञान कथेवर आधारित चित्रपटात काम केले. पण हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर पूर्ण अयशस्वी झाला. १९९४ मध्ये ‘व्हॉट्स ईटिंग गिल्बर्ट ग्रेप’ या चित्रपटासाठी त्यांना उत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात अाले. वयाच्या केवळ एकोणिसाव्या वर्षी असा सन्मान मिळविणारे ते पहिले अभिनेते होते.


  १९९७ साली टायटॅनिक चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाने ते रातोरात स्टार बनले. यानंतर त्यांनी पर्यावरण सुरक्षेसाठी ‘लिओनार्डो डिकैप्रियो’ या नावानेच एक संस्था बनवून चांगले काम केले. १९९८ साली पीपल्स मॅगेझिनने जगातील पहिल्या सुंदर पन्नास लोकांमध्ये त्यांना सामील केले. लिओला चार चित्रपटांसाठी ऑस्करसाठी नामांकन केले. पण यश मिळाले नाही. शेवटी २०१६ मध्ये रेवेनंट चित्रपटासाठी त्यांना आॅस्कर पुरस्कार मिळाला. याशिवाय निर्माता म्हणूनही त्यांचे ऑस्कर नामांकन झाले आहे. २०१५ मध्ये ७३ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून पुरस्कार दिला गेला.

  यांच्यापासून मिळालेली शिकवण
  - कोणतेही काम प्रेमाने करा.
  - सतत अपयशी होणे वाईट नाही. धीर धरून मेहनत करा म्हणजे अवश्य यशस्वी होताल.
  - आपल्या कम्फर्ट झोनमधून लवकरात लवकर बाहेर येणे फार गरजेचे आहे.

Trending