आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

58 वर्षीय होमगार्डचा 'डर्टी पिक्चर', खाकी परिधान करून विद्यार्थिनीं महिलांना करत होता 'बॅड टच'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोच्ची - केरळमध्ये एका होमगार्डने खाकीची इज्जत घालवणारे कृत्य केले आहे. याठिकाणी एक होमगार्ड ड्युटीवर असताना महिला आणि तरुणींची छेड काढत असल्याचे दिसून आले. रस्त्यावरून जाणाऱ्या महिला, तरुणींना तो चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होता. त्याठिकाणी उभ्या असलेल्या एका व्यक्तीच्या ते लक्षात आले आणि त्याने याचा व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. आरोपी होमगार्डचे नाव शिवा कुमार असून त्याचे वय 58 वर्षे आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


ट्राफिक ड्युटीवर होता आरोपी 
होमगार्ड शिवा कुमारची ड्युटी कोच्चीच्या थेवारा परिसरात लागलेली होती. शाळेची वेळ असल्याने अनेक विद्यार्थिनी त्याठिकाणाहून जात होत्या. तेव्हा आरोपी शिवा कुमार रस्त्याच्या कडेला उभा राहिला आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना टच करत होता. 2 मिनिट 50 सेकंदाच्या त्याच्या व्हिडिओमध्ये त्याने अनेक मुलींना बॅड टच केल्याचे पाहायला मिळाले. मुलींना त्याचे हे कृत्य लक्षात आले पण त्याच्या ड्रेसमुळे कदाचित त्याला कोणी काही बोलले नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनीच  आरोपीच्या विरोदात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या मते आरोपीने 2016 मध्ये होमगार्ड म्हणून काम करायला सुरुवात केली होती. 

बातम्या आणखी आहेत...