आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होम मिनिस्टरच्या भारत दौऱ्यामुळे महाराष्ट्र बाहेरील प्रेक्षक आनंदी, भाऊजींना हैद्राबादवरुन आले पत्र

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होम मिनिस्टर’ आणि आदेश बांदेकर हे समीकरण झाले आहे, तर आदेश भाऊजी हे अल्पावधीतच प्रत्येक मराठी कुटुंबातील सदस्य बनले आहेत. केवळ १३ भागांसाठी सुरु झालेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आदेश बांदेकर यांच्यावर देण्यात आली आणि तेरा भागांसाठी सुरू झालेल्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाने आज सोळा वर्षांचा टप्पा पूर्ण केला. आता या लोकप्रिय कार्यक्रमाचा भारत दौरा सुरु आहे.

या भारत दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेरील प्रेक्षकवर्ग खूप सुखावला आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांचे प्रेम आदेश बांदेकरांपर्यंत पोहचत आहे. दिल्ली, इंदूर, अहमदाबाद इकडे दौऱ्या केलेल्या भाऊजींना चक्क हैदराबादवरुन देखील एका चाहत्याचे पत्र आले, ज्यात त्याने झी मराठी या वाहिनीचे आभार मानले आहेत. होम मिनिस्टरचा नुकताच सुरु झालेला भारत दौरा स्तुत्य असल्याचे त्यांनी या पत्रात सांगितले आहे. होम मिनिस्टरच्या भारत दौऱ्यामुळे ही वाहिनी महाराष्ट्राच्या बाहेरील मराठी समाजाला एकत्र आणतेय आणि त्यांच्याशी देखील नाते जोडतेय हे खरंच उल्लेखनीय आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. भारताच्या विविध जिल्ह्यातून आपल्याला इतके प्रेम मिळतेय हे पाहून आदेश बांदेकर देखील भारावून गेले आहेत.  

बातम्या आणखी आहेत...