आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तीन तलाकसारखी कुप्रथा बंद केली नसती, तर भारतीय लोकशाहीवर हा सगळ्यात मोठा डाग असता'- अमित शाह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज(रविवार) दिल्लीच्या कॉन्स्टीट्यूशन क्लमध्ये आयोजित कार्यक्रमात तीन तलाकवर भाष्य केले. ते म्हणाले, मतांच्या ध्रुवीकरणामुळेच अनेक वर्षांपासून तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाले नव्हते. काही राजकीय पक्षांना मतांचे राजकारण करण्याची सवय झाली आहे. ध्रुवीकरणाच्या या राजकारणात तीन तलाक विधेयक दुर्लक्षित राहिले.

पुढे ते म्हणाले, ''तिहेरी तलाक भारतातून हद्दपार करण्यासाठी आम्हाला 56 वर्षे लागली. यामागे काँग्रेसचे नीच राजकारण होते. जर तिहेरी तलाक इस्लामविरोधी असते तर, मुस्लिम देशांनी ते बंद का केले असते ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाक संपवणे हे केवळ आणि केवळ मुस्लिम समाजाच्या फायद्यासाठी उचललेले पाऊल आहे. जर आज आम्ही हे विधेयक मंजूर केले नसते तर ते भारतीय लोकशाहीसाठी मोठा डाग असता. तिहेरी तलाकविरोधात मुस्लिम महिलांनी मोठी लढाई लढली आहे. नरेंद्र मोदी सरकारने साडे पाच वर्षात 25 हून अधिक ऐतिहासिक निर्णय घेवून देशाची दीशा बदलण्याचे काम केले आहे. ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची कमाल आहे, असे अमित शहा यावेळी म्हणाले. अमित शहा यांनी तिहेरी तलाकवरून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला.

सुप्रीम कोर्टाने तीन तलाकला इस्लामविरोधी म्हटले
शाह म्हणाले, ''राजीव गांधींच्या सरकारमध्ये मंत्रीपद सोडून आरिफ मोहम्मद खान तीन तलाकविरोधी आदोंलनात सामील झाले होते. ही लढाई सुरुच राहीली आणि शायरा बानोने स्पीड पोस्टातून तलाक मिळाल्यामुळे कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने तीन तलाकला असंविधानिक आणि -इस्लामविरोधी करार केले. त्यानंतर शायराला मुस्लिम कट्टरपंथ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला."

आम्ही मुस्लिम महिलांच्या बाजूने निर्णय दिला
"यावेळेस राजीव गांधी नाहियेत, नरेंद्र मोदींची सरकार आहे. आम्ही मुस्लिम महिलांच्या बाजूने निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने म्हटले की, जर कुरानच्या विरोधी असेल तर तीन तलाक मुस्लिमांच्या फायद्याचे कसकाय आहे."