आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहमंत्री अमित शहांची नवापूरमध्ये जाहीर सभा, सभा मंडपासमोरील काटेरी झुडपे धोकादायक स्थितित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उद्या (19 ऑक्टोबर) भाजपाचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांच्या प्रचारार्थ नवापूरमध्ये सभा आयोजित केली आहे. सभेसाठी अमित शहा नवापूरमधील कृणाल हॉटेल समोरील मैदानात सभेसाठी येतील. सधअया सभेची तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून याठिकाणी मोठा मंडप उभारण्यात आला आहे. पण, यात एक अडचण निर्माण झाली आहे. मंडपासमोरील काटेरी झुडपात सरपटणारे प्राणी असल्यामुळे नागरिकांमध्ये भय पसरले आहे.


उद्या अमिहत शहांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहे. शहांच्या प्रचार सभेच्या पुढील मोकळ्या जागी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची संरक्षण भीतीने बंदीस्त मोकळी जाग आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत व काटेरी झुडपे वाढलेले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे काटेरी झुडपे व गवत काढणे गरजेचे होते. परंतु गवत काटेरी मोठ्या प्रमाणात असल्याने काढणे शक्य झाले नाही. शहा यांची जिल्ह्यातील पहिलीच सभा आणि महायुतीच्या प्रचाराचीदेखील ही पहिलीच सभा असल्याने या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. 


या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी व भाजपचे उमेदवार भरत गावित यांनी केले आहे. माजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री माणिकराव गावित यांनी सभा मंडपात जाऊन पाहाणी केली. तसेच, देशाचे गृहमंत्री येत असल्याने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी नंदुरबार अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय अधिकारी रमेश पवार, नवापूर पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या सोबत हेलीपॅडमधून सभा मंडप व आजूबाजूची परिस्थिती पाहणी केली. 

बातम्या आणखी आहेत...