आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरातुन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुत्राचा विजय तर आदिवासी विकास मंत्री पाडवींच्या पत्नीचा तोरणमाळमधून पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळेंना बालेकिल्ल्यात पराभवाचा सामना करावा लागला

नागपूर- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घारत परत एकदा गुलाल उढळला जाणार आहे. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सलील देशमुखांनी नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी मिळवला. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.सलील देशमुख राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी अनिल देशमुखांनी विधानसभेसाठी मुलाची शिफारस केली होती. पण, विधानसभावारी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत झेंडा रोवण्यात यश आले आहे. नागपूरचा गड राखताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपुरात चांगली पकड घेतल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.

के.सी. पाडवींच्या पत्नी पराभूत

दुसरीकडे राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा नंदूरबारमधील तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूत लढणाऱ्या आदिवासी विकालमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभवाला सामना करावा लागला.

बातम्या आणखी आहेत...