आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Home Minister Prof. Anjali Maydeo Help Adv. Prakash Ambedkar

होम मिनिस्टर प्रा. अंजली मायदेव : महिला आघाडीची जबाबदारी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अँड. बाळासाहेब ऊर्फ प्रकाश म्हणजे ‘राज्यघटना’कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू. भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष. ‘अकोला पॅटर्न’चे जनक. निवडणूक काळात त्यांना पत्नी प्रा. अंजली मायदेव कशी साथ देतात याविषयी अंजलीताईंच्याच शब्दात..
मी नोकरीनिमित्ताने पुण्यात असते, पण निवडणुका लागल्या की मोठी सुटी टाकून अकोल्यात येते. नवर्‍याला पाठबळ देणे, हेतू असतोच. पण ‘भारिप’च्या महिला आघाडीची जबाबदारी सांभाळणे आणि संसदीय मुख्य प्रवाही राजकारणात उतरून आपले मुद्द पुढे आणणे त्यामागचे मुख्य कारण असते.
आमचा विवाह 1993 चा. बाळासाहेबांनी लोकसभेची पहिली निवडणूक 1985 मध्ये लढवली. अकोला जिल्हय़ास ‘भारिप’चा बालेकिल्ला बनवला. मी 1996 पासून प्रचारात उतरले. पुण्यात राहत असले तरी दरमहा अकोल्याला चक्कर होतेच. पक्षाच्या महिला आघाडीची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. तसा माझा पिंड समाजकार्यकर्तीचा आहे. त्यामुळे निवडणुका, सभा, जनसामान्यांचे प्रश्न या सर्व गोष्टी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. निवडणूक काळात अकोल्यातील आमच्या घरी मोठी धामधूम असते. कार्यकर्त्यांचा दिवसरात्र राबता असतो. माझे आणि बाळासाहेबांचे दौरे वेगवेगळ्या ठिकाणी असतात. बाळासाहेब सकाळी सातला घराबाहेर पडतात. पण जाताना न चुकता घरचा डबा घेऊन जातात. घरी यायला त्यांना रात्री एक-दोन होतात.
प्रचाराच्या रणनीतीबाबत आम्ही चर्चा करतो. त्या वेळी मी मात्र केवळ पत्नीच्या भूमिकेत नसते तर पहिल्या फळीतील नेत्याच्या भूमिकेत असते. पक्षाचा जाहीरनामा सर्वसमावेशक व्हावा, याविषयी मी सजग असते. आम्ही एकमेकांच्या दृष्टिकोनाचा, मतांचा आदर करतो. मग तो पक्षातील निर्णय असो की कौटुंबिक..!
कोपरा सभा मला अधिक भावतात. हातात भोंगा घेऊन बोलायला मी हिचकिचत नाही. महिलांशी संवाद साधायला आवडते. लोकसभा निवडणुका राष्ट्रीय प्रo्नांशी संबंधित असतात. पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे व्यापकतेने मांडण्याचा अवकाश मिळतो. त्यामुळे या निवडणुकीत मी तयारीनिशी उतरते. यंदाची निवडणूक ऐतिहासिक आहे. मोदींची लाट असल्याचा प्रचार शिगेला आहे. फॅसिस्ट प्रवृत्तीने मोठे आव्हान उभे केले आहे. प्रादेशिक पक्षांवर मोठी जबाबदारी आहे. म्हणून अस्थिर सरकार चालेल पण फॅसिस्ट प्रवृत्तीचा पराभव होणे आवश्यक आहे.
0शब्दांकन : अशोक अडसूळ, मुंबई