आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Surgical Strike -2: राजनाथ सिंह यांनी दिले संकेत; म्हणाले, काही तरी घडलंय, आताच सांगणार नाही!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानात नुकतेच आणखी सर्जिकल स्ट्राइक झाल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी येथे शुक्रवारी बोलताना यासंदर्भात म्हटले, की बीएसएफ जवान नरेंद्र सिंहसोबत पाकिस्तानकडून काही दिवसांपूर्वीच अतिशय अमानवीय व्यवहार करण्यात आला. दोन ते तीन दिवसांपूर्वीच काही घडले आहे. परंतु, त्यासंदर्भातील माहिती मी आताच सांगणार नाही. तर दुसरीकडे, बीएसएफ प्रमुखांनी जवान शहीद झाल्यानंतर यशस्वी कारवाई करण्यात आली असे म्हटले आहे. 

 

आणखी काय म्हणाले, गृहमंत्री?
मुजफ्फरनगरच्या शुक्रतीर्थ येथे शुक्रवारी राष्ट्रीय लष्करी कार्यक्रमात गृहमंत्र्यांनी सांगितले, की "शेजारील राष्ट्र पाकिस्तान आपल्या नापाक हालचाली काही सोडत नाही. वारंवार तो बीएसएफच्या जवानांसोबत असे अमानवीय कृत्य करत आहे." यानंतर राजनाथ म्हणाले, की आपण यानंतर काही पाहिले असेल. काही तरी घडले. परंतु, मी सांगणार नाही. हे जे घडले ते ठीकच घडले आहे. आपण आमच्यावर विश्वास ठेवू शकता. दोन ते तीन दिवसांपूर्वी एकदम बरोबर झाले आहे. पुढे पाहत जा काय होणार आहे. 

 

पाकने जवानाचे डोळे, हात कापून दिल्या अमानुष यातना
- काही दिवसांपूर्वीच सांबा जिल्ह्यातील रामगड सेक्टरमध्ये शहीद बीएसएफ जवान नरेंद्र सिंह (51) वर पाकिस्तानने अमानुष अत्याचार केले. जखमी अवस्थेत असताना त्यांचे अपहरण केले आणि 9 तासानंतर त्यांचा मृतदेह विक्षिप्त अवस्थेत सापडला होता. त्यांचा गळा चिरला, एक पाय कापून वेगळा केला आणि डोळे सुद्धा काढले होते. बीएसएफ जवानच्या पाठीवर वीजेचे झटके दिल्याच्या खुणा होत्या. शहीदाच्या शरीरावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी एक सुरुवातीला केलेल्या हल्ल्यात लागली. त्यावेळीच जखमी असताना जवानाचे अपहरण करण्यात आले. 9 तास यातना दिल्यानंतर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
- नरेंद्र आपल्या टीमसह बॉर्डरवर वाढलेली गवत कापण्यासाठी गेले होते. त्याचवेळी पाकिस्तानने त्यांच्यावर गोळीबार केला. अचानक झालेल्या बेछूट फायरिंगमध्ये कुणाला काहीच कळले नाही. यानंतर अख्खी टीम तेथून निघण्यात यशस्वी ठरली. परंतु, त्यातील नरेंद्र सिंह बेपत्ता झाले. याच घटनेचा पाकिस्तानकडून बदला घेण्यासाठी भारतीय जवानांनी आणखी एक सर्जिकल स्ट्राइक केली असे संकेत राजनाथ सिंह यांनी दिले आहेत. यापूर्वी 29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मिरात सर्जिकल स्ट्राइक करून 40 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.

 

बातम्या आणखी आहेत...