आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Home Minister's First Statement After Deletion Of Article 2; I Was Skeptical, But I Had No Idea What Would Happen Next

कलम ३७० हटवल्यानंतर गृहमंत्र्यांचे प्रथमच वक्तव्य; मनात शंका होती, पण नंतर काय होईल, याबद्दल संभ्रम नव्हता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यासाठी राज्यसभेत विधेयक मांडताना सभागृहाची काय प्रतिक्रिया असेल, अशी शंका होती. परंतु त्याचे परिणाम काय होतील, याबद्दल काहीही संभ्रम नव्हता, असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे. 

उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळावर आधारित पुस्तक ‘लिस्निंग, लर्निंग अँड लिडींग’चे विमोचन केल्यानंतर शहा यांनी या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, वरिष्ठ सभागृहात आम्हाला बहुमत नाही. मग विधेयकावरून सभागृह कसे चालेल ? असे मनात येत होते. असे असूनही सर्वात आधी ते राज्यसभेत मांडण्याचा निर्धार केला. आंध्र प्रदेशच्या विभाजनावेळचे चित्र आजही जनतेच्या डोळ्यासमोर आहे. अशा परिस्थितीचा भाग होण्याची माझी मुळीच इच्छा नव्हती. 

एकही नळकांडी फोडण्याची गरज भासली नाही :
कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर सहा दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये अश्रुधुराची एकही नळकांडी फोडण्याची गरज भासली नाही. आता तेथे शांतता आहे, असे माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. ३७० कलम हटवण्यात गृहमंत्री अमित शहा यांची भूमिका व योगदान महत्त्वाचे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये केंद्राचे १०६ कायदे लागू होत नव्हते. परंतु शहा यांनी तेथील जनतेला त्यांचे अधिकार प्रदान केले आहेत.शहा यांनी पक्षाला बळकट करण्यातही मोठे योगदान दिल्याचे जावडेकर यांनी सांगितले.भाजपच्या संघटनात्मक पातळीवरील बळकटीकरणासाठी मिस्ड कॉलची योजना खूप प्रभावी ठरली.
 

विधेयक आले तेव्हा तणावात होतो : नायडू 
५ ऑगस्ट रोजी विधेयक राज्यसभेत मांडले गेले. तेव्हा तणावाखाली होताे. कारण मला सभागृह सांभाळायचे होते. मला बळाचा वापर करून लोकांना सभागृहाबाहेर काढण्याची इच्छा नव्हती. तेलंगणा-आंध्र प्रदेश विभाजनाच्या वेळी असे घडले होते. दरवाजे बंद करून दूरदर्शनचे थेट प्रसारण रोखावे व ३०-४० लोकांची हकालपट्टी व्हावी, असे मला वाटत नव्हते. सुदैवाने सर्व पक्षांच्या सदस्यांनी आपले म्हणणे मोकळेपणाने मांडले. मत विभाजनही याेग्य पद्धतीने झाले, असे नायडू यांनी सांगितले. 
 

कृष्ण-अर्जुनासारखी  जोडी : रजनीकां
अभिनेता रजनीकांत यांनी शहा यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, मिशन काश्मीरसाठी तुमचे अभिनंदन. संसदेत काश्मीरवर दिलेले भाषण अतिशय शानदार होते. तुम्हाला सलाम. अमित शहा-मोदी यांची कृष्ण-अर्जुनासारखी जोडी आहे. त्यापैकी कृष्ण कोण व अर्जुन कोण हे आपण जाणतो, असे रजनीकांत यांनी सांगितले.