आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंबर दुखतेय...तर मग करा हे सोपे आणि छोटे छोटे उपाय 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला सतत कमरेच्या दुखण्याने त्रस्त असतात. जर काही सावधगिरी बाळगली तर या समस्येपासून बचाव होऊ शकेल. 


- जड वजन उचलताना किंवा जमिनीवरील कोणतीही वस्तू उचलताना कमरेतून वाकू नका, अगोदर गुडघे वाकवून खाली वाका आणि ज्या वेळी हात त्या वस्तूपर्यंत पाेहोचेल तेव्हा उचलून गुडघे सरळ करत उभे राहा. 


- अधिक काळ एकाच स्थितीत बसून काम करू नका, तर काही वेळानंतर उभे राहा किंवा बसण्याची स्थिती बदला. यामुळे कमरेला आराम मिळतो. या प्रकारे ज्यांना कमरेत दुखत असेल तर त्यांनी जाड गादीवरच झोपावयास पाहिजे. 


- खुर्चीवर बराच वेळ बसायचे असेल तर आपल्या पाठीला अशा प्रकारे टेकवून बसा की ती कायम सरळ राहील. मानेला सरळ ठेवण्यासाठी खुर्चीच्या मागे एक जाड टॉवेल घडी घालून ठेवू शकता. जेणेकरून कमरेवर अतिरिक्त दाब पडू नये. 

बातम्या आणखी आहेत...