Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedies for burping in Marathi

ढेकर येत असल्यास 10 सोपे उपाय, अवश्य ट्राय करून पाहा

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 16, 2019, 12:10 AM IST

ढेकर म्हणजे पोटातील गॅस तोंडाद्वारे बाहेर पडणे. हे आजाराचे लक्षण नसले तरी चार चौघात ढेकर येणे योग्य दिसत नाही.

 • home remedies for burping in Marathi

  ढेकर म्हणजे पोटातील गॅस तोंडाद्वारे बाहेर पडणे. हे आजाराचे लक्षण नसले तरी चार चौघात ढेकर येणे योग्य दिसत नाही. जेवताना अतिरिक्त हवा पोटात शिरल्यामुळे ढेकर येण्याचा प्रकार घडतो. येते आम्ही ढेकरावर उपाय सांगत आहोत जे अगदी सोपे आहेत:

  पाणी : सतत ढेकर येत असल्यास घाेट घाेट गार पाणी प्यावं.
  बडीशेप : पोटासंबंधित समस्यांसाठी बडीशेप लाभदायक आहे. याने गॅसची समस्या दूर होते. बडीशेपचे रस आणि गुलाबजल समप्रमाणात मिळवून पिण्याने उचकी आणि ढेकर येणे थांबते. आपण बडीशेप चावूनही खाऊ शकता.


  वेलची : ढेकर आल्यावर वेलची टाकून केलेला चहा हळूहळू प्यावा.
  पुदिना : पुदिनाचे सेवन केल्याने पोट स्वच्छ राहतं. पुदिन्याची पाने चहात टाकून सेवन करावे.


  कोथिंबीर : ढेकर येत असल्यास कोथिंबीरची काडी चावावी.
  सोडा : गॅस विकारात सोडा पिणे फायदेशीर आहे. सोडा असॅडिक असल्यामुळे गॅसपासून मुक्ती मिळते.


  लिंबू : काही न मिसळता ताज्या लिंबाचे रस प्यावं.
  आलं : आल्याचा चहा पिण्याने किंवा आल्याचा रस मध मिसळून पिण्याने फायदा होतो.
  लवंग : सतत ढेकर येत असल्यास तोंडात एक लवंग ठेवून चघळावी.

Trending