Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedies for calorie burn in Marathi

कॅलरी बर्न करण्याचे सोपे घरगुती चार उपाय 

दिव्य मराठी | Update - Mar 16, 2019, 12:01 AM IST

अनेक संशोधनांनुसार हे सिद्ध झाले आहे की, दररोज दोन तास घरात काम केले तर कॅलरी सहज जळतात

  • home remedies for calorie burn in Marathi

    अनेक संशोधनांनुसार हे सिद्ध झाले आहे की, दररोज दोन तास घरात काम केले तर कॅलरी सहज जळतात.


    1. झाडणे व पुसणे
    केर काढणे आणि फरशी पुसल्यामुळे ३०० ते ३५० कॅलरी जळतात. यामुळे हात सुडौल होतात आणि शरीराच्या वरच्या भागाचे स्नायू बळकट होतात. फरशी पुसण्यासाठी ज्या वेळी तुम्ही वारंवार वाकता त्यामुळे पोटावर आणि मांड्यावर जमा झालेली चरबी कमी होऊ लागते.


    2. बागकाम करणे
    बागकाम केल्यामुळे मांसपेशींची कार्यक्षमता वाढते. यामुळे सांध्यांमध्ये लवचिकता येते. जर तुम्ही अर्धा तास गार्डनमध्ये पाणी देणे, खुरपणे, रोप लावण्यासारखी कामे केली तर पोट, हात आणि नितंबावर दबाव पडतो. यामुळे जवळपास ४०० कॅलरी जळतात.


    3. बाथरूमची स्वच्छता
    यामध्ये सर्वांत जास्त पाय, पोट आणि नितंबाच्या आजूबाजूचे स्नायू काम करतात. यामुळे हाताला आणि खांद्याला बळकटी मिळते. बाथरूमच्या टाइल्स स्वच्छ करणे हा पोट आणि नितंबावरील चरबी कमी करण्याचा सोपा उपाय आहे.


    4. कपडे धुणे
    वॉशिंग मशीनऐवजी हातांनी कपडे धुण्याची प्रक्रिया तुम्हाला फिट ठेवण्यास मदत करते. कपडे धुताना तुमच्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. एक तास कपडे धुणे आणि वाळवणे यादरम्यान १३० ते १५० कॅलरी जळतात.


    कोणत्या कामासाठी किती कॅलरी जळते
    गादी टाकणे - २० कॅलरी
    दरवाजे स्वच्छ करणे - 70 कॅलरी
    भांडी घासणे 1 तास धुतल्यास -125 कॅलरी
    स्वयंपाक करणे 1 तासात - 150 कॅलरी
    प्रेस करणे - 1 तास केल्यास 128 कॅलरी

Trending