आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मणक्यात वेदना असल्यास करू नका याकडे दुर्लक्ष, पॅरालिसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व्हायकल पेन मानेपासून सुरू होऊन शरीराच्या इतर भागांतही होते. वेळीच याकडे लक्ष दिले नाही तर पॅरालिसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. यासाठी हे उपाय करून तुम्ही निरोगी राहू शकता. 


व्यायाम
सर्व्हायकलमध्ये नसांवर दबाव पडल्यामुळे दुखणे मानेपासून पायांच्या अंंगठ्यापर्यंत जाणवते. यापासून बचावासाठी हळूहळू क्लॉकवाइज आिण अँटी क्लॉकवाइज फिरवा. डोक्याला वर-खाली आिण उजव्या-डाव्या बाजूने फिरवल्यास फायदा होतो. 


मानेची मालिश 
सर्व्हायकल झाल्यावर मेंदूला रक्त पुरवठा करणारी रक्तवाहिनी मध्येच काही वेळासाठी बंद होऊ शकते. मानेत दुखत असेल तर कोणत्याही तेलाने हलक्या हाताने मालिश करा किंवा करून घ्या. मालिश नेहमी मानेकडून खांद्याकडे करावी. 


गरम पाण्याचा शेक 
सर्व्हायकलमध्ये अचानक हात खूप दुखू लागतो. निष्काळजीपणा केल्यास पॅरालिसिसची शक्यता नाकारता येत नाही. यापासून बचावण्यासाठी मालिशनंतर गरम पाण्याने शेका. यानंतर ताबडतोब मोकळ्या हवेत जाऊ नका, थंड पदार्थ खाऊ नका. 


झोपण्याची पद्धत 
जे लोक उंच उशी घेतात, त्यांना सर्व्हायकल पेन सारखा सारखा होतो. म्हणून उशीऐवजी मऊ टॉवेलला गुंडाळून घ्या. सोबतच चांगली गादीही वापरल्यामुळे या दुखण्यापासून बचाव होऊ शकतो. 


आहाराकडे लक्ष 
कॅल्शियम आिण व्हिटॅमिन डीयुक्त पौष्टिक आहार घ्या. यामुळे हाडांना मजबुती मिळते, जे सर्व्हायकल पेनपासून बचाव करण्यास मदत करते. चहा आिण कॉफी घेणे टाळा.