Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedies for cough in Marathi

खोकल्याचा खूप त्रास होतोय, तर हे करा उपाय 

रिलिजन डेस्क, | Update - Jul 30, 2019, 12:20 AM IST

बदलत्या वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम सर्वात पहिले खोकल्याच्या रूपात समोर येतो. कफ सिरप घेणे याचा चांगला इलाज असू शकतो परंतु हेल्थसाठी हे योग्य नाही. यासाठी सर्वात अगोदर घरगुती उपाय अवलंबावे...  

 • home remedies for cough in Marathi

  बदलत्या वातावरणाचा शरीरावर होणारा परिणाम सर्वात पहिले खोकल्याच्या रूपात समोर येतो. कोरडा खोकला जसे घसा दुखण्याचे कारण असते तसेच कफचा खोकला श्वासाची समस्या निर्माण करते. कफ सिरप घेणे याचा चांगला इलाज असू शकतो परंतु हेल्थसाठी हे योग्य नाही. यासाठी सर्वात अगोदर घरगुती उपाय अवलंबावे...


  अद्रक : अद्रकाचे तुकडे मधासोबत चघळा. या व्यतिरिक्त अद्रकाचा ज्यूस काढून त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकून पिणे देखील खूप फायदेशीर राहील.


  मध : मध चाटणे हा खोकला दूर करण्यासाठी फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी १ चमचा मध घ्या. याचे अँटिबॅक्टेरियल तत्त्व खोकल्यापासून आराम देतात.


  हळद : नियमित दिवसातून एकदा हळदीचे दूध प्यावे. पाण्यात हळद, ओवा, मिरे, दालचिनी आणि मीठ एकत्र उकळा आणि हे कोमट झाल्यावर प्या. हळदीचे अँटिबॅक्टेरियल गुण खूप लवकर आराम देतात.


  लसूण : लसणाच्या पाकळ्या कच्च्या चावा किंवा पाण्यात उकळून काढ्याप्रमाणे प्या. हो दोन्हीही प्रकारे सेवन करणे फायदेशीर असते. कडवटपणा दूर करण्यासाठी यामध्ये चवीनुसार मध टाकता येऊ शकते.


  मिठाचे पाणी : कोरडा असो किंवा कफचा खोकला दोन्हीही प्रकारच्या खोकल्याचा इलाज मिठाच्या पाण्याने होतो. यासाठी मिठाचे पाणी प्या आणि गुळण्या करा. याची उष्णता मिळाल्याने सर्व अडचणी दूर होतील.


  गरम दूध : रात्री झोपण्याअगोदर किंवा सकाळी नाष्ट्यानंतर गरम दुधाचा वापर करा. कफचा खोकला दूर करण्याचा हा क्विक फॉर्म्युला आहे. परंतु यामध्ये साखर टाकू नका. लवकर आराम मिळवण्यासाठी हळद आणि मधाचा वापर करा.


  मिरे : मिरे खाणे थोडे अवघडच असते. परंतु खोकला लवकर दूर करण्यासाठी हे खूप फायदेशीर असते. हे बारीक करून तुपासोबत भाजून घ्या. रोज दिवसातून कमीत-कमी 3-4 वेळा घ्या. हे दुधात टाकून देखील पिता येऊ शकते.


  कांदा : जेवणात जेवढा करता येईल तेवढा कांद्याचा वापर करा. यासोबतच कच्च्या कांद्याचा रस आणि त्यामध्ये मध टाकून प्या. कोरडा असो किंवा कफचा प्रत्येक प्रकारचा खोकला दूर होतो.

Trending