Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedies for cough in marathi

अद्रक-दालचिनी तसेच या घरगुती उपायांनी खोकला लावा पळवून

हेल्थ डेस्क | Update - Dec 06, 2018, 12:07 AM IST

साध्या खोकल्यावर अलोपॅथी औषध घेतल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. याऐवजी आयुर्वेदिक औषधे किंवा घरगुती उपाय जास्त फायदेशीर ठरू

 • home remedies for cough in marathi

  या वातावरणात ब्रॉंकायटिस म्हणजेच कफाच्या खोकल्याचा त्रास होऊ शकतो. उत्तराखंड आयुर्वेदिक विश्वविद्यालयाचे आरोग्य वृत्त विभाग प्रमुख डॉ. अवधेश मिश्रा सांगतात की, साध्या खोकल्यावर अलोपॅथी औषध घेतल्याने दुष्परिणाम होऊ शकतात. याऐवजी आयुर्वेदिक औषधे किंवा घरगुती उपाय जास्त फायदेशीर ठरू शकतात. डॉ. मिश्रा सांगतात की, अनेक घरगुती उपाय करून खोकला मुळापासून नष्ट केला जाऊ शकतो. आज आपण असेच 8 उपाय जाणून घेणार आहोत...


  खोकला दूर करण्याचे खास उपाय
  - एक कप पाण्यात एक अद्रकाचा तुकडा, चिमूटभर दालचिनी आणि मिरे टाकून उकळून घ्या. कोमट झाल्यावर गाळून मध मिसळून प्या.


  - लसणाच्या 3-4 पाकळ्या आणि अर्धा चमचा हळद एक ग्लास दुधामध्ये टाकून उकळा. रोज रात्री झोपण्यापूर्वी प्या.


  - एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून रोज सकाळी उपाशीपोटी घ्या.


  - एक कप पाण्यात 4-5 लवंगा टाकून उकळा. कोमट झाल्यानंतर यामध्ये अर्धे लिंबू पिळा आणि एक चमचा मध मिसळून प्यावे.


  - मोहरीच्या तेलामध्ये 4-5 पाकळ्या लसूण टाकून गरम करा. झोपण्यापूर्वी या कोमट तेलाने पायाच्या तळव्यावर आणि छातीवर मालिश करा.


  - एक कप पाण्यात अर्धा चमचा ज्येष्ठमधाची पावडर आणि ८-१० तुळशीची पाने टाकून उकळा. हे कोमट करण्याऐवजी चहाप्रमाणे प्या.


  - तव्यावर तुरटी भाजून घ्या. याची पावडर बनवून गुळासोबत नियमित घेतल्याने फायदा होतो.


  - जवस आणि तीळ समान प्रमाणात मिसळून भाजून घ्या. याची पावडर बनवून सकाळ-संध्याकाळ कोमट पाण्यासोबत एक चमचा घ्या.

Trending