आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 3 घरगुती उपायांनी दूर करू शकता डोळ्यांचा कोरडेपणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डोळ्यांमध्ये अश्रू कमी असल्यामुळे कोरडेपणा वाढायला लागतो. याकडे कानाडोळा न करता वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. अन्यथा कॉर्नियाशी संबंधित आजार आणि संसर्ग होण्याची शक्यता वाढते. हा आजार दूर करण्यासाठी खाली दिलेल्या तीन उपायांचा अवलंब करा. 


1. डोळे शेकणे
स्वच्छ कापड कोमट पाण्यामध्ये बुडवून त्याद्वारे पाच मिनिटांपर्यंत आपले डोळे शेका. डोळ्यांचा लालसरपणा आणि खाज दूर करण्यामध्येही ही पद्धत फायदेशीर ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. 


2. पौष्टिक आहार 
आपल्या आहारत ओमेगा 3 फॅटी अॅसिड्स असलेल्या जवसाच्या बिया, अक्रोड, बदाम आणि मासे यांचा समावेश करा. हे पदार्थ डोळ्यांचा कोरडेपणा दूर करण्यात मदत करतात. 


3. गुलाब जल 
गुलाब जलामध्ये व्हिटॅमिन ए असते. यामुळे डोळ्यांचा तजेलदारपणा टिकून राहतो. आयलिडवर कापसाच्या मदतीने गुलाब जल लावल्याने डोळ्यांचा कोरडेपणा दूर व्हायला लागतो.