आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोट आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करण्याचे घरगुती उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक खाद्यपदार्थ चरबीचे विघटन करतात किंवा नियंत्रणात ठेवतात. या पदार्थांचे नियमित सेवन केल्याने पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पोट आणि कमरेच्या जवळ जमा झालेली चरबी कमी करायची असल्यास त्यासाठी फक्त व्यायाम पुरेसा नाही. व्यायामासोबतच आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 


पाणी : शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पोटाचा आकार वाढत जातो. शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे, जास्त खाण्यापासून बचाव आणि पाचनक्रिया योग्य पद्धतीने सुधारण्यासाठी पाण्याची महत्त्वाची भूमिका असते. पाण्यामुळे चयापचय प्रक्रिया तीव्र होते. ती कॅलरी जाळण्यासाठी आवश्यक असते. पाण्याप्रमाणे रस घेणे आरोग्याच्या दृष्टीने चांगली सवय आहे. 


जवस : यात मोनोसॅच्युरेटेड फॅट्स असतात. ते कमरेभोवती जमा होणारी चरबी कमी करतात. सोबतच कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा नियंत्रणात राहते. जवसात भरपूर प्रमाणात फायबर असते. ते पचन प्रणालीसाठी गरजेचे असते. याचा वापर सलाडमध्ये करता येतो. 


दही : दह्यात फॅट आणि कॅलरी कमी असते. परिणामी ते वजन कमी करण्यासाठी मदतीचे ठरते. जेवणात आणि स्नॅक्समध्ये याचा वापर करावा. दह्यात असणारे प्रो-बायोटिक पोटातील बॅक्टेरिया वाढीस चालना देतात. ते पचन प्रणालीत सुधारणा करतात. 


लाल रंगांची फळे : स्ट्रॉबेरी, रासबेरी यासारख्या लाल रंगाच्या फळांचा आहार घेतल्याने सुद्धा पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार चरबी कमी करण्यासाठी सर्व प्रकारची लाल आणि जांभळ्या रंगाची फळे खाल्ली पाहिजे. यातील अँथोसिएनिन्स नावाच्या अँटिऑक्सिडंटमुळे चरबीचे विघटन होते. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन सीमुळे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते. 

बातम्या आणखी आहेत...