आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती उपाय : डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मान्सूनमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे डास आणि त्यांच्या चावण्यामुळे होणारे आजार. पावसाळयात मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया आजारांचा धोका वाढतो. या आजारांपासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय केले जाऊ शकतात.


7 उपाय : डास पळवून लावण्यास मदत करतील 
कापूर जाळावा - खोलीमध्ये कावीळ जाळावा. 10 मिनिट घराची दारे-खिडक्या बंद ठेवा. सर्व डास नष्ट होतील.


केरोसीन(रॉकेल),लिंबाचे तेल आणि कापूर : एका दिव्यामध्ये केरोसीन आणि काही थेंब लिंबाचे तेल टाकावे. कापूरच्या दोन वड्या टाकाव्यात. हा दिवा लावून ठेवावा. यामुळे डास नष्ट होतील.


लिंबू आणि लवंगाचे पाणी : जास्त डास असलेल्या ठिकाणी लिंबू आणि लवंगाचे पाणी शिंपडावे. डास जवळपास भटकणाराही नाहीत.


लिंबू आणि निलगिरीचे तेल : रिकाम्या मॉस्किटो रिप्लेण्ट बॉटलमध्ये लिंबाचा रस आणि निलगीचे तेल भरून लावा.


लिंबाचे तेल : लिंबाचे तेल हात-पायांना लावावे आणि त्यानंतर नारळाच्या तेलामध्ये लिंबाचे तेल मिळसून दिवा लावावा.


सिट्रोनेला कँडल लावावी : सिट्रोनेला एक प्रकारची हर्ब असून याचा वास डासांना आवडत नाही आणि यामुळे ही मेणबत्ती लावल्याने डासांपासून सहजपणे मुक्ती मिळते.


झोपताना हे अवश्य करा : झोपताना लसणाची पाकळी चावून खाल्ल्याने डास चावत नाहीत. यासोबतच लसणामुळे शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित राहतो.

बातम्या आणखी आहेत...