आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडीत डोक्यात खाज येतेच मग करा हे उपाय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थंडीमुळे डोक्याची त्वचा कोरडी पडते, परिणामी खाज येते. अनेकदा डोके खाजवण्यापासून आपण राहू शकत नाही इतकी तीव्र खाज येते. मात्र लोकांमध्ये असताना खाजवणे योग्य वाटत नाही. त्यामुळे अशाच डोक्याला येणाऱ्या खाजेने त्रस्त असाल तर या काही टिप्स -

लिंबाचा रस : लिंबाच्या रसात अँटिसेप्टिक घटक असतात. ताज्या लिंबाचा रस पूर्ण डोक्याच्या त्वचेवर लावा आणि ५ मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर शाम्पूने केस धुवा. फक्त लिंबाचा रस लावल्याने डोक्याच्या त्वचेला जळजळ होत असेल तर त्यात थोडे पाणी घालून किंवा लिंबू रस दह्यात मिक्स करून वापरू शकता.

बेकिंग सोडा : डोक्याच्या त्वचेला खाज येत असल्यास बेकिंग सोडाही उपयुक्त ठरतो. डोक्याच्या त्वचेवर वाढणाऱ्या बॅक्टेरिया आणि फंगी यांना रोखण्याची क्षमता बेकिंग सोड्यात आहे. बेकिंग सोड्यामुळे मृत त्वचा निघते आणि त्या ठिकाणी नवीन त्वचा येण्यास मदत होते. सुरुवातीला डोक्याच्या त्वचेवर ऑलिव्ह ऑइल लावावे. त्यानंतरच बेंकिग सोडा पाण्यात मिक्स करून लावावा. १० ते १५ मिनिटांनी केस धुवावेत.

नारळ तेल : नारळ तेलामुळे डोक्याची त्वचा मॉइश्चर राहते, त्यामुळे डोक्याच्या त्वचेला खाज येत नाही. डोक्याला खाज येत असल्यास खोबरेल तेल हा चांगला पर्याय आहे. खोबरेल तेल थोडे कोमट करा आणि डोक्यावर मसाज करा. ३० मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून ३ वेळा असे केल्यास डोक्याच्या त्वचेला येणाऱ्या खाजेपासून मुक्ती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...