आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीरात हे बदल दिसल्यास आजपासूनच बदला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शरीरात दिसणाऱ्या या संकेतांना ओळखा आणि आजपासूनच बदला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी...


1. केस गळणे 
आयर्न आणि प्रथिनांच्या कमतरतेमुळे केसांवर वाईट परिणाम होतो. सोबत फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन बी 12 आणि फॉलिक अॅसिडच्या कमतरतेमुळे केस पातळ होतात. यापासून बचावासाठी आहाराकडे लक्ष द्या. 
 

2. त्वचेसंबंधी समस्या 
जर तुमच्या त्वचेवर नेहमी मुरूम येतात, सुरकुत्या किंवा डाग दिसून येतात किंवा त्वचा कोरडी राहत असेल तर तुम्हाला व्हिटॅमिन, खनिजे आणि फॅटी अॅसिडयुक्त आहार घ्यायला पाहिजे. 


3. तणावात राहणे 
ओमेगा-३ फॅटी असिड्स, कार्बोहाइड्रेट, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी योग्य प्रमाणात न घेतल्यामुळे तणाव येऊ शकतो. यापासून बचावासाठी हिरव्या पालेभाज्या, फिश किंवा अंडी आणि दूध घेणे सुरू करा. 


4. थकवा जाणवणे 
जर तुम्हाला सतत थकवा जानवत असेल तर तुमच्या आहारात अशा तत्त्वांची कमतरता आहे ज्यात ऊर्जा मिळते. यासाठी तुमच्या आहारात साखर आणि कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थाचा समावेश करा. 


5. सतत आजारी पडणे 
जर तुम्ही सतत आजारी पडत असाल तर, तुमच्या आहारात जास्तीत जास्त व्हिटॅमिन, विशेषत: व्हिटॅमिन सी चे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. म्हणून संत्री, आवळा आणि लिंबू खा. 


6. नखे तुटणे 
नखे पांढरे होणे, त्याचा आकार बदलणे याचा अर्थ असा की, शरीरात आयर्नची कमतरता असू शकते. या वेळी तुमच्या आहारात जास्त अायर्न असलेला आहार जसे बीट, खजूर आदी खावे. 

बातम्या आणखी आहेत...