आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास कामी करतील हे घरगुती उपाय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कडक उन आणि आर्द्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. यापासून बचाव करण्यासाठी या सोप्या उपायांचा अवलंब करून पाहा, फरक पडेल. 


कडुनिंबाची पाने 
घामोळ्यांपासून त्रस्त असाल तर कडुनिंबाची पाने पाण्यात उकळून घ्या आणि त्यापासून अंघोळ करा. यामुळे घामोळ्या लवकर दूर होतील. चंदन पावडर लावल्यानेही घामोळ्या दूर होतील. पावडरप्रमाणे शरीरावर लावावे. चंदन पावडर पाण्यात घोळून याचा लेप घामोळ्यांवर लावू शकता. 


काकडी देईल थंडावा 
शरीर थंड ठेवण्यासाठी काकडीची खूप मदत होते. घामोळ्यांपासून बचावाचा हा उत्तम उपाय आहे. यासाठी पाण्यात लिंबाचा रस टाका आणि या पाण्यात काकडीचे पातळ तुकडे कापून टाका. यानंतर हे तुकडे घामोळ्यांच्या जागेवर लावा. असे केल्याने घामोळ्या लवकर बऱ्या होतील. 


मुलतानी मातीचा लेप 
घामोळ्यांवर मुलतानी मातीचा लेप लावल्यानेही आराम मिळतो. यासाठी मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून त्याचा लेप तयार करा. यामुळे घामोळ्यांमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होईल. कोरफडीच्या पानांचा लेप दिवसातून दोनवेळा घामोळ्यांवर लावल्यानेही फायदा होतो. 


बाळाला घामोळ्या झाल्यावर हे करा 
लहान बाळाला घामोळ्या झाल्यास त्याची अंघोळ घातल्यानंतर टॉवेलऐवजी हवेद्वारे त्याची त्वचा वाळू द्या. बाळाला कॉटन किंवा मखमलीचे हलके कपडे घाला. यामुळे घामोळ्या बऱ्या होतील. तरीदेखील बऱ्या होत नसल्यास डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या. 


कच्च्या आंब्याचा लेप 
कच्चा आंबा मंद आचेवर भाजून घ्या व त्यातील गर काढून तो शरीरावर लेपासारखा लावा. असे केल्यास घामोळ्या दूर होतील. कारण कच्चा आंबा शरीराची उष्णता थंड करण्यामध्ये अत्यंत लाभदायक असल्याचे सिद्ध झाले आहे. खोबरेल तेलात कापूर मिसळून घामोळ्यांवर लावता येईल.