आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
न्युमोनिया हा हिवाळ्यात होणारा आजार. वेळीच या आजाराकडे लक्ष नाही दिले तर फप्फुसांमध्ये पाणी भरते. यापासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
1. हळद
हळद श्वसनाचा त्रास कमी करते व फप्फुसे निरोगी ठेवण्यात मदत करते. हळद कफ कमी करते. याशिवाय यामध्ये असलेले अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुण न्युमोनियाच्या संसर्गापासून बचाव करतात. यातील अँटिऑक्सिडंट्स सांधेदुखीचा त्रास कमी करण्यातही मदत करतात.
असा करा वापर : हळद टाकून दूध प्या. हळद व मिरेपूड ग्लासभर कोमट पाण्यात मिसळून त्याचे सेवन करता येईल.
2. लसूण
यात मँगनीज, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, सेलेनियम, फायबर असते. यापासून व्हायरल व फंगल इंफेक्शनपासून बचाव होतो. प्रतिकारशक्तीही वाढते. लसणामुळे ताप कमी होतो. छाती व फुप्फुसांत जमा झालेला कफ बाहेर पडतो.
असा करा वापर : रोज अनशापोटी लसणाच्या पाकळ्या खा. लसूण मधासोबत खाणेही फायद्याचे ठरते.
3. तुळस
यामध्ये अँटी फंगल आणि अँटी व्हायरल प्रॉपर्टीज असतात. त्या न्युमोनियापासून बचाव करण्यात मदत करतात. यामधील युजेनॉल सर्दी आणि खोकला बरा करण्यामध्येही परिणामकारक आहे. दररोज रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्ल्याने फायदा होतो.
असा करा वापर : तुळशीच्या पानांचा रस काढून त्यात काळे मिरे मिसळा. ते सकाळ-सायंकाळ खा. तुळशीचा चहा प्यायल्यानेही फायदा होतो.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर दोन पदार्थांची माहिती...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.