आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबू-मधाने घालवा केसातील कोंडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यामध्ये केसांत कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. तो घालवण्यासाठी काही घरगुती उपचार फायद्याचे ठरू शकतात. या उपायांद्वारे तुम्ही घरच्या घरी कोंडा दूर करू शकता. तसेच केसांच्या समस्यादेखील काही प्रमाणात दूर केल्या जाऊ शकतात. > तुम्हाला केसातील कोंडा दूर करायचा असेल तर दह्यामध्ये अंड्यातील पांढरा भाग आणि मध मिसळून केसांना लावा. ३० मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर केस धुऊन घ्या. यामुळे लगेच फरक जाणवेल आणि हिवाळ्यातही तुमचे केस सुंदर राहतील. > दर आठवड्याला नियमितपणे मसाज करावा. हे केस आणि मेंदूसाठी फायद्याचे आहे. याने मेंदूला आराम मिळतो, रक्ताभिसरण सुरळीत होते आणि केस वाढण्यास मदत होते. थंडीच्या दिवसांत मोहरीचे तेल कोमट करून मालिश करावी किंवा खोबरेल तेलही वापरू शकता. > कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी लिंबू आणि मध एकत्र करून केसांना लावावे. लिंबामधील सायट्रिक अॅसिडमुळे कोंडा होत नाही, तर मधामुळे डोक्याच्या त्वचेत ओलावा राहतो. हे मिश्रण आठवड्यातून २ ते ३ वेळा २५ मिनिटासांठी केसांना लावावे आणि शाम्पू करावा. > थंडीच्या दिवसांत ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता. यामुळे केसांमध्ये कोंडा होत नाही आणि केसदेखील चिकट होत नाहीत. ऑलिव्ह ऑइलमध्ये मध मिसळून हेअर मास्कही करू शकता. हा मास्क लावत्यानंतर ३० मिनिटानंतर शाम्पू करावा. आठवड्यातून दोन वेळा केल्यास कोंडा पूर्णपणे नाहीसा होतो.

बातम्या आणखी आहेत...