आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्दीमुळे चोंदलेल्या नाकासाठी घ्या कांद्याचा वास, श्वास घेण्यास होणार नाही त्रास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिवाळ्यात नाक बंद होणे ही एक सामान्य बाब आहे. सतत होणाऱ्या या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी हे उपाय करावे. 


वाफ घ्या
वाफ घेतल्यामुळे चांेदलेले नाक माेकळे होते. यासाठी एका भांड्यात पाणी गरम करा आणि मग भांड्याच्या वर तोंड ठेवून एका टॉवेलने तुमच्या डोके झाकून घ्या. काहीवेळ वाफ घ्या. थोड्याच वेळात चोंदलेले नाक उघडेल. 


भरपूर पाणी प्या 
नाक चोंदलेल्या अवस्थेत भरपूर पाणी प्या. यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. हायड्रेटेड राहिल्यास नाकामध्ये असणारा म्युकस पातळ होतो. यामुळे तुमच्या साइनसचा दबाब कमी होतो. अद्रकाचा चहादेखील पिऊ शकता. 


कांद्याचा वास घ्या : कांदा चोंदलेल्या नाकापासून सुटका मिळण्यास फायदेशीर आहे. यासाठी कांदा सोलून जवळपास पाच मिनिटे त्याचा वास घ्या. यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होणार नाही. 


लिंबूचा उपयोग 
चांेदलेले नाक मोकळे करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. यासाठी दोन चमचे लिंबाच्या रसात अर्धा चमचा काळे मिऱ्याची पावडर व एक चिमूट मीठ टाकून तुमच्या नाकाला लावा. थोडावेळ तसेच ठेवा नंतर धुवून घ्या. 


तुळशीचा फायदा 
सर्दीमध्ये नाक चोंदल्यास तुळशीचा वापर करा. यासाठी ताजी तुळशीची पाने नाष्ट्यापूर्वी घ्या आणि रात्री जेवणानंतर चावा. चहामध्ये तुळशीच्या पानांचाही उपयोग करू शकता. 


मधाचा करा वापर 
मध पोषक तत्त्वयुक्त अाहे. जर दोन चमचे मध गरम पाणी, दूध किंवा चहाबरोबर घेतल्यास चांेदलेले नाक मोकळे होण्यास मदत होेते. विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी याचा उपयोग अवश्य करायला पाहिजे. 

बातम्या आणखी आहेत...