आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापावसाळ्यात सर्दी-खोकला सर्वांनाच होतो. मोठ्यांचे एकवेळ ठीक आहे, पण लहान बाळांना या नाक चोंदण्यानं खूप त्रास होतो.आज घरच्याघरी लहान बाळाची सर्दी घालवायचे अगदी सोपे उपाय जाणून घेऊयात. - बाळाच्या तळपायाला हलकसं व्हिक्स चोळा. वरून सॉक्सही चढवले तर परिणाम आणखी लवकर दिसून येईल. - तव्यावर चार मध्यम आकाराच्या लसणाच्या पाकळ्या आणि थोडा ओवा भाजा. गरम असतानाच या दोन पदार्थांना एखाद्या रुमालात बांधून त्याची पुरचुंडी /पोटली बनवा. पोटली थंड झाल्यावर ती बाळाच्या उशाशी ठेवून द्या. त्या वासानेच सर्दी पळून जाईल. - दोन-तीन थेंब आल्याचा रस चमचाभर मधात छान मिसळा.थोड्या कोमट पाण्यातून हे मिश्रण बाळाला हळूहळू पाजा. अर्थातच हा उपाय एक वर्षाहून मोठ्या वयाच्या बाळासाठीच करा. - गरम पाण्यात व्हिक्स टाकून बाथरूम बंद करा. बाथरूमभर व्हिक्सचा घमघमाट होईल. मग बाळाला घेऊन तिथे बसा म्हणजे एकप्रकारे बाळाला व्हिक्सची वाफ मिळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.