आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण क्लीनअप, फेशियल आणि ब्युटी एक्स्पर्टनी सांगितलेल्या टिप्स फॉलो करतो. पण पायांचे काय? कारण पायांची म्हणावी तशी काळजी घेत नाही. त्यामुळे चेहरा आणि पाय यात खूप फरक जाणवायला लागतो. पण पायांची योग्य काळजी घेतली तर पायाची त्वचाही तितकीच सुंदर दिसू शकते. तर मुलायम आणि कोमल पायांसाठी घरच्या घरी काय करू शकतो ते पाहा...,
घरी आल्यानंतर गरम पाण्यात १ मोठा चमचा बेकिंग पावडर टाका. या पाण्यात २० ते ३० मिनिटे पाय ठेवा. पाण्यातून पाय काढून कोरडे करून घ्या. पाय कोरडे केल्यानंतर लगेचच पायात झालेला बदल जाणवेल. शक्य असल्यास हा प्रयोग रोज करण्यासही काही हरकत नाही.
पायावरील मृत त्वचा काढण्यासाठी कॉफी हा चांगला पर्याय आहे. बाजारात जाडी भरडी कॉफी पावडर मिळते. ते फिल्टर कॉफीचाच उरलेला भाग असतो. एका भांड्यात ३ ते ४ चमचे जाड दळलेली कॉफी घेऊन त्यात लिंबाचा रस घालून थोडी थीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि ती पायाला चोळायची आहे. कॉफी पायावरील घाण काढून टाकते.
त्वचा मुलायम होण्यासाठी केळदेखील वापरले जाते. घरी एखादे पिकलेले केळ असेल तर ते स्मॅश करून घ्या आणि पायांना केळ्याची पेस्ट लावा. हा मास्क पूर्ण वाळल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुऊन घ्या. कोरडे करून त्यावर मॉश्चरायझर लावा. आठवड्यातून एकदा तरी केळ्याचा मास्क लावा.
ओठांपासून ते पायांच्या तळव्यांपर्यंत व्हॅसलीन लावण्याचा सल्ला दिला जातो. व्हॅसलीन जेली घेऊन ती संपूर्ण पायाला लावायची आहे. व्हॅसलीन पायावरून जाऊ नये आणि घसरून पडायला नको म्हणून तुम्ही मोजे घालायला हवे. त्यामुळे हा प्रयोग रात्रीच्यावेळी करा. शिवाय पायांना भेगा पडल्या असतील तरी व्हॅसलीनने त्या भरून निघतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.