Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedies for Sperm Increase

शुक्राणू सशक्त करण्याच्या काही सोप्या घरगुती Tips, अवश्य फॉलो करा

हेल्थ डेस्क | Update - Aug 09, 2018, 12:03 AM IST

ह्युमन रिप्राॅडक्शन अपडेट्स नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार मागच्या काही वर्षांत जगातील पुरुषांमधील श

 • home remedies for Sperm Increase

  ह्युमन रिप्राॅडक्शन अपडेट्स नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार मागच्या काही वर्षांत जगातील पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि त्यांची तीव्रता कमी झाल्याचे म्हटले होते. अनेक देशांत बदललेल्या जीवनशैलीमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाली आहे...


  शुक्राणूंची सशक्तता कशी ठरवतात?
  संख्या :
  एका सामान्य परिस्थितीत स्खलनात 15 मिलियन प्रतिमिलिमीटर शुक्राणू असू शकतात. स्पर्मची संख्या खूप कमी असेल तर यामुळे प्रजननक्षमता कमजोर होऊ शकते.


  हालचाल : अंडकोष तयार होण्यासाठी शुक्राणूंची हालचाल तीव्र असावी लागते. जर 40 टक्क्यांपेक्षा जास्त शुक्राणू महिलेच्या गर्भपिशवीत आणि अंडकोशनलिकेत गेले तर गर्भधारणेची शक्यता वाढते.


  आकार : एका सामान्य आणि सशक्त शुक्राणूचा आकार समोरून अंडाकार आणि मागून लांब शेपटीसारखा असतो. याच माध्यमातून शुक्राणू गर्भाशयापर्यंत जातात. शुक्राणूंची संख्या जेवढी जास्त असेल तेवढी गर्भधारणेची शक्यता वाढते.


  शुक्राणू सशक्त कसे बनवावे?
  शुक्राणू जास्त सशक्त, वेगवान आणि गर्भधारणेयोग्य बनवण्यासाठी आपली जीवनशैलीही चांगली हवी.
  1. चौरस आहार घ्या (युनिव्हर्सिटी ऑफ रोचेस्टरचे संशोधन)
  टोमॅटो, आवळा, लसूण, डाळिंब, भोपळ्याचे बीज, स्ट्रॉबेरी यांसारखी फळे आणि हिरव्या पालेभाज्या जास्त खाल्ल्याने शुक्राणू सशक्त होतात.


  2. व्यायाम करा (हार्वर्ड मेडिकल स्कूलचे संशोधन)
  नियमित व्यायाम करणाऱ्या पुरुषाचे शुक्राणू व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीपेक्षा 30 टक्क्यांनी जास्त असू शकतात.

  3. दारू- सिगारेट सोडा (जर्नल बीएमजे ओपनचे संशोधन)
  आठवड्यातून पाचपेक्षा जास्त अल्कोहाेलिक ड्रिंक आणि जास्त सिगारेट प्यायल्याने स्पर्म काउंट कमी होऊ शकतो.

  4. वस्तूंचा योग्य वापर (क्वीलँड क्लिनिकचे संशोधन)
  पँटच्या समोरच्या खिशामध्ये मोबाइल आणि मांड्यांवर लॅपटॉप ठेवल्याने शुक्राणू खराब होऊ शकतात. संख्या कमी होऊ शकते.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर टिप्स...

 • home remedies for Sperm Increase

  5. वजन नियंत्रित ठेवा (स्टेनफोर्ड युनिव्हर्सिटीचे संशोधन) 
  40 इंचांपेक्षा जास्त कंबर असणाऱ्या लोकांमधील शुक्राणूंची संख्या सामान्य माणसापेक्षा 22 टक्क्यांनी कमी असू शकतात. 

   

  6. जंक फूड कमी खा (जर्नल रिप्राॅडक्शनचे संशोधन) 
  जास्त चरबी असलेले आणि तेलकट, सोया प्राॅडक्ट, जास्त मीठ आणि गोड खाणाऱ्या व्यक्तींमधील शुक्राणूंची संख्या 40 टक्क्यांनी कमी असू शकते. 

 • home remedies for Sperm Increase

  7. जास्त आैषधे न घेणे (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, यूएसएचे संशोधन) 
  अनेक स्टेरॉइड्स, डिप्रेशनचे औषध, शक्तिवर्धक औषधी यामुळे स्पर्म डॅमेज होतात. त्यांच्या क्वालिटीवर प्रभाव पडू शकतो. 


  8. ताणतणाव टाळा : (नॅशनल हेल्थ सर्व्हिसेस, यूकेचे संशोधन) 
  स्ट्रेस आणि टेन्शनमुळे शरीरात अनेक हार्मोन्स तयार होतात. हे हार्मोन्स स्पर्म डॅमेज करतात आणि त्यांची संख्या कमी करतात. 

Trending