आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या नैसर्गिक गोष्टींचा वापर करूनही दूर करू शकता दातांचा पिवळेपणा, पांढरेशुभ्र होतील दात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दातांचा पिवळेपणा वाढण्याची अनेक कारण आहेत. म्हणजेच सिगारेट पिणे, पौष्टिक आहार न घेणे किंवा दातांची योग्य स्वच्छता न करणे यामुळे ही समस्या वाढते. हे टाळण्यासाठी काही नैसर्गिक वस्तूंचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होतो. या पदार्थांमधील अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज दातांमधील बॅक्टेरिया नष्ट करून दातांची चमक वाढवतात. सौंदर्यतज्ज्ञ शीला एन. किशोर सांगत आहेत अशाच १० उपायांबाबत. 


- लिंबाचे साल दातांवर हलक्याने घासल्याने दातांची शायनिंग वाढते. 


- अक्रोडची पेस्ट बनवून दातांवर हलक्याने मालिश केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. 


- तुळशीची पाने बारीक करा. हे दातांवर लावून मालिश केल्याने दातांची चमक वाढते. 


- मिठामध्ये सरसोचे तेल मिसळून दातांवर हलक्याने मालिश केल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो. 


- दातांवर बेकिंग सोडा लावल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो. 


- संत्र्याचे साल वाळवून पावडर बनवा. हे दातांवर लावल्याने दातांची चमक वाढते. 


- ऑलिव्ह ऑइल दातांवर लावा. हे पाच मिनिटांनंतर पाण्याने धुवा. यामुळे दात चमकतात. 


- ब्रश केल्यानंतर दातांवर खोबरेल तेल लावा. यामुळे दातांची चमक टिकून राहते. 


- स्ट्रॉबेरी बारीक करून पेस्ट बनवा. याने दातांची हलक्याने मालिश केल्याने दात चमकतात. 


- सफरचंदाचा पल्प दातांवर घासल्याने दात स्वच्छ होतात. हे चावून खाल्ल्याने दातांचा पांढरेपणा वाढतो.

बातम्या आणखी आहेत...