आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यांखालील काळी वर्तुळे नाहीसे करतील हे घरगुती उपाय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्याहूनही अधिक नाजूक आणि पातळ त्वचा डोळ्यांच्या भोवतालची असते. बदलती जीवनशैली त्याचप्रमाणे कमी झोप, संगणकावर सतत काम करणे, मोबाइलचा जास्त वापर, थकवा याचा परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात.  डोळ्यांखाली काळी वर्तुळेे आल्यास करा हे उपाय  - एक चमचा गुलाब जल आणि काकडीच्या रसाचे मिश्रण करावे. कापसाने डोळ्यांखाली लावावे.  - अर्धा चमचा काकडीचा रस, दोन थेंब मध, बटाट्याचा रस आणि बदामाचे तेल व्यवस्थित मिसळून घ्या. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण डोळ्यांखाली लावल्याने फरक पडतो.  - किसलेल्या बटाट्याने डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करावी. नियमित असे केल्यास समस्या दूर होईल.  - बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करून लावावी.  - मध,बदाम तेल सम प्रमाणात घ्या. याला व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाचा फायदा होतो. 

बातम्या आणखी आहेत...