Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Try some home remedies to increase appetite

भूक वाढवण्यासाठी करून पाहा हे काही घरगुती उपाय 

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 20, 2019, 12:15 AM IST

काही लोकांना नीट भूक लागत नाही. त्यामुळे असे लोक वेळेवर जेवत नाहीत. यामुळे अशक्तपणा येऊ लागतो. 

  • Try some home remedies to increase appetite

    काही लोकांना नीट भूक लागत नाही. त्यामुळे असे लोक वेळेवर जेवत नाहीत. यामुळे अशक्तपणा येऊ लागतो.


    - काळ्या मिठाने गॅसेसची समस्या कमी होते आणि भूक वाढते. पोटही साफ राहते.
    - हिरड्याचे चूर्ण, सुंठ, गूळ, सैंधव मीठ एकत्र घेतल्यानेही ही समस्या दूर होते.


    - सैंधव मीठ, हिंग, ओवा आणि त्रिफळा हे सर्व समप्रमाणात घेऊन त्याचे चूर्ण करावे. चूर्णाएवढाच गूळ त्यात मिसळावा आणि त्याच्या छोट्या गोळ्या कराव्यात. जेवणानंतर एक-दोन गोळ्या घ्याव्यात.
    - सफरचंदाने भूक वाढून रक्त शुद्धी होते.


    - हिरडा कडूनिंबाच्या निंबोण्यांबरोबर खाल्ला तर भूक वाढते. त्वचारोग नाश होतो.
    - हिरडा, गूळ, सुंठ यांचे चूर्ण करून थोड्या प्रमाणात ते मठ्ठ्याबरोबर घ्यावे.


    - सुंठीचे चूर्ण तुपात मिसळून गरम पाणी प्यायल्यास चांगली भूक लागते.
    - रोज जेवण करण्याआधी आल्याला सैंधव मीठ लावून खाल्ल्यास भूक वाढते.
    - गव्हाच्या कोंड्यामध्ये सैंधव मीठ आणि ओवा घालून त्याची पोळी बनवून खावी, त्यामुळेही ही समस्या दूर होते.

Trending