Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | home-vastushanti-puja-

गृहप्रवेश पूजेच्यावेळी काय करावे...

दिव्य मराठी टीम | Update - May 19, 2011, 11:31 AM IST

गृहप्रवेश करताना मनाला शांती मिळावी, यासाठीच पूजाअर्चा केली जाते.

  • home-vastushanti-puja-

    नव्या घरात सुख समृद्धी यावी, आयुष्यातील सगळी दुःख हद्दपार व्हावी, याच विचाराने कोणीही नव्या घरात प्रवेश करीत असतो. गृहबांधणीमागेही सामान्यपणे हाच विचार असतो. गृहप्रवेश करताना मनाला शांती मिळावी, यासाठीच पूजाअर्चा केली जाते. नव्या घरावर कोणतंही संकट न येवो. त्यावर ईश्वराची कृपा राहू दे, यासाठी गृहप्रवेश करताना पूजा करण्याची पद्धत रुढ झालीये. नव्या घरात सकारात्मक ऊर्जा स्थिरावण्यासाठीच वास्तूशांती किंवा वास्तूपूजा करण्याची आवश्यकता आहे.
    वास्तूशांती केल्यानंतर गृहप्रवेश केल्याने प्रगती आणि समृद्धी येऊ शकते. वास्तूपूजा करताना वास्तू जप जरूर करावा. दुर्गादेवीची अक्षता, लाल पुष्प आणि कुंकवानी पूजा करावी. धूप, दीपसहित देवीला नैवैद्य दाखवावा. यामुळे निश्चितच घरामध्ये सुख समृद्धी येईल. दुर्गासप्तशती पाठाचे सलग नऊ दिवस वाचन करावे. नवव्या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी बोलवावे. महामृत्युंजय मंत्राचे पठण करावे, यामुळेही लाभ होऊ शकतो.Trending