आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन श्वानांमुळे कपलला फिरावे लागतेय रस्त्यांवर, महिन्याला होत आहे 65 हजारांचा खर्च, एका वचनामुळे करवा लागतेय असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉर्थेम्प्टन - इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका वयस्कर कपलला गेल्या चार महिन्यांपासून कारमध्ये राहावे लागतेय. त्याचे कारण म्हणजे त्यांनी दिलेले एक वचन. शेजाऱ्यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांनी त्यांच्या दोन कुत्र्यांना आयुष्यभर सांभाळण्याचे वचन दिले होते. पण त्यानंतर घर मालकाने त्यांना घर सोडण्यास सांगितले. तेव्हापासूनच चे रस्त्यावर फिरून दिवस काढत आहेत. जास्त कमाई नसल्याचे या कपलची आर्थिक स्थितीही हलाखीची झाली आहे. 


वचनामुळे सोडावे लागले घर.. 
- नॉर्थेम्पटनमध्ये राहणारे जेनिफर टायसो (70) आणि त्यांचे पती निगेल (54) यांच्या शेजाऱ्यांचे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी निधन झाले. 
- त्यावेळी या कपलने शेजाऱ्यांना त्यांच्या पाळीव कुत्र्यांना सांभाळण्याचे वचन दिले. यात एका कुत्र्याचे नाव बॅकी (कॉकर स्पेनियल प्रजाती) आहे तर दुसऱ्याचे नाव टायटन (स्टेफोर्डशायर बुल टेरियर प्रजाती) आहे. 
- शेजाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी वचनाप्रमाणे दोन्ही कुत्री घरी नेली पण त्यांच्या घरमालकाला ते आवडले नाही. त्यांनी त्यांना घर सोजण्यास सांगितले. 


कारमध्ये रहाणे परवडेना 
- कपलने सहा महिने नवे घर शोधले. पण कुत्र्यांमुळे कोणीही त्यांना घर द्यायला तयार होत नव्हते. त्यानंतर जुलैमध्ये कपलने घर रिकामे केले आणि तेव्हापासून ते 'प्यूजो 208' कारमध्ये राहत घर शोधत आहेत. 
- या कपलने आता स्थानिक प्रशासनाकडे घराची मागणी केली आहे. प्रशासनाने त्यांना आणि कुत्र्यांना स्वतंत्र घर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी स्वतंत्र घर घेण्यास नकार दिला. 
- या कपलचा उदरनिर्वाह पेन्शन आणि सेव्हींगवर सुरू आहे. पण कारमध्ये राहावे लागत असल्याने पेट्रोलवर प्रचंड खर्च होत आहे. महिनाभरात त्यांचे जवळपास 65 हजार रुपये खाणे पिणे आणि पेट्रोलवर खर्च होतात. 

बातम्या आणखी आहेत...