आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेघर समजुन महिलेने माणसाला नोकर म्हणून ठेवले, दोन आठवड्यानंतर बदलली सगळी परिस्थीती...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मिनियापोलिस- अमेरिकेच्या मिनेसोटा प्रांतात कॅफे चालवणाऱ्या महिलेसोबत स्तब्ध करणारी घटना घडली. या संपूर्ण घटनेला तिने आपल्या सोशल मिडिया अकांउंटवर शेअर केले. एके दिवशी एक बेघर व्यक्ती तिच्याकडे आला आणि तिला काही पैसे मागु लागले. महिलेने त्याला पैसे न देता आपल्या कॅफेमध्ये कामावर ठेवले. त्यानंतर जे झाले ते पाहून ती महिला भावूक झाली.

 

महिलेने पैसे देण्यास नकार दिला

- ही घटना मार्च 2016 ची आहे, एके दिवशी मिनियापोलिस शहरात राहणारी सेसिया अबिगेल आपल्या कॅफेत बसली होती. तेव्हा तिच्याकडे मार्कस नावाचा एक बेघर व्यक्ती आला आणि पैसे मागु लागला.
- सेसियाने त्याला नकार दिला आणि म्हणली- 'तुला माहितीये का? मला येथे काहीच फुकट मिळत नाही. तु पैसे मागण्या ऐवदी कुठे काम का नाही करत ?'
- महिलेचे बोलने ऐकताच तो म्हणाला,-'मलाही काम करायचे आहे. हे असे मागुन खाणे मला आवडत नाही, पण क्रिमिनल रेकॉर्ड असल्यामुळे मला कोणीही काम देत नाही. म्हणून मला रस्त्यावर काम करण्याशिवाय पर्याय नाही.'


व्यक्तीचे बोलने ऐकूण झाली भावूक

- मार्कसची गोष्ट ऐकुण सेसिया भावूक झाली. त्यानंतर तिने त्याला नोकरी देण्याचा विचार केला. तिला माहित होते की, तो क्रिमिनल बॅकग्राउंडमधला आहे पण तरीही तिने त्याला कामावर ठेवले.
 

फेसबुकवर शेअर केली घटना

- सेसियाने या संपूर्ण घटनेला फेसबूकवर शेअर केले. तिने लिहीले की, ' त्यावेळेस माझ्याकडे स्टाफची कमी होती त्यामुळे मी त्याला काम करण्यासाठी विचारले. हे ऐकुण त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आला, आणि त्याने लगेच काम करण्यास होकार दिला. तो मला भांडे धुने, साफ सफाई इत्यादी कामात मदत करू लागला. दोन आठवड्यानंतर मी त्याला त्याच्या कामाचे पैसे दिले. त्यानंतर त्याने ते पैसे माझ्याच रेस्तरॉमध्ये जेवण करून खर्च केले. हे करून त्याला खुप आनंद झाला होता, त्याच्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला होता. आपण नेहमी गरजु लोकांना मदत केली पाहिजे. प्रत्येत मागुन खाणारा व्यक्ती भिकारी नसतो, त्याच्या या अवस्थेमागे काहीतरी कारणदेखील असु शकते. देवाने आपल्याला काही दिले तर आपण गरिबांना दिले पाहिजे. '

 

बातम्या आणखी आहेत...