Home | International | Other Country | Homeless man who help woman sues for funds collected video

अर्ध्या रात्री अचानक हायवेवर बंद पडली कार, महिला उतरणार तेवढ्यात अचानक भिकाऱ्याने जवळ येऊन केले असे काही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 10:29 AM IST

अमेरिकेत गतवर्षी नोव्हेंबरमध्ये एका बेघर व्यक्तीद्वारे महिलेला केलेली मदत खूप चर्चेत राहिली होती.

 • Homeless man who help woman sues for funds collected video

  फिलाडेल्फिया - अमेरिकेत गतवर्षी नोव्हेंबरमध्ये एका बेघर व्यक्तीद्वारे महिलेला केलेली मदत खूप चर्चेत राहिली होती. मध्यरात्री भररस्त्यात महिलेच्या गाडीतील पेट्रोल संपले होते. अशा वेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बेघर व्यक्तीने महिलेला आपल्या जवळचे शिल्लक सर्व पैसे देऊन तिला घरी पोहोचण्यासाठी मदत केली होती. यानंतर महिला आणि तिच्या पार्टनरने मिळून बेघर व्यक्तीच्या मदतीसाठी ऑनलाइन फंड गोळा केला. परंतु बेघर व्यक्ती म्हणते की, या रकमेतील अर्धे पैसे त्याला मिळालेच नाहीत.


  अर्ध्या रात्री महिलेची केली मदत
  - फिलाडेल्फियामध्ये गतवर्षी नोव्हेंबरमध्ये ही घटना घडली, जेव्हा केट अर्ध्या रात्री आपल्या घरी परतत होती. वाटेत तिच्या कारमधील पेट्रोल संपले. तिच्या ते टाकण्यासाठी पैसेसुद्धा नव्हते.
  - केट हायवेवर आपली कार उभी करून जवळच्याच एका पेट्रोल पंपावर एकटीच पायी जात होती. अशा वेळी रस्त्याच्या कडेला बसलेल्या एका बेघर व्यक्तीने तिच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
  - त्याने केटला कारमध्ये जाऊन दार लॉक करून बसण्यासाठी सांगितले. यानंतर तो स्वत: पायीच पेट्रोल स्टेशनवर गेला आणि आपल्याजवळचे सर्व शिल्लक पैसे खर्च करून पेट्रोलची कॅन विकत घेतली. त्याने ती केटला आणून दिली, जेणेकरून ती सुरक्षितरीत्या घरी पोहोचू शकेल.
  - बेघर व्यक्तीने या बदल्यात तिच्याकडे काहीच मागितले नाही. अशी उदारता पाहून केटचे मन भरून आले आणि तिने त्याच्या मदतीचा निर्णय घेतला.


  महिलेने केली या बेघर व्यक्तीची मदत
  - नंतर केटने त्या व्यक्तीला आधी पेट्रोलचे पैसे परत केले आणि मग त्याच्यासाठी कपडे, जेवण आणि पाण्याची व्यवस्था केली. यानंतर तिने पार्टनरसोबत मिळून फंड गोळा करण्यासाठी गोफंडमी पेज लॉन्च केले.
  - बेघर व्यक्तीच्या मदतीच्या कहाणीने जगभरातील लोकांना भावुक केले. त्याच्यासाठी दानशूरांकडून तब्बल 2 कोटी 92 लाख रुपयांची रक्कम गोळा झाली. ज्यापैकी 21 लाख पेजची फीस गेली.


  अर्धी रक्कमही मिळाली नाही
  - आता बेघर व्यक्तीने या रकमोतून स्वत:ला केवळ 53 लाख रुपये मिळाले असल्याचे सांगितले आहे. यामुळे पेज ऑर्गेनाइज करणाऱ्या कंपनीच्या प्रवक्त्याने पैशांचा दुरुपयोग झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.
  - त्यांचे म्हणणे आहे की, बेघर व्यक्तीच्या नावावर जमा झालेली रक्कम केट आणि तिच्या पार्टनरने पूर्णपणे दिली नाही, स्वत:साठीसुद्धा वापरली आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या प्रकरणाचे आणखी Photos व video...

 • Homeless man who help woman sues for funds collected video
 • Homeless man who help woman sues for funds collected video
 • Homeless man who help woman sues for funds collected video

Trending